
प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…
कच्छ (गुजरात): एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) अरुणा जाधव (वय २५) यांची त्यांच्या सीआरपीएफ जवान या प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तो वाचला आणि शनिवारी सकाळी अंजार पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले.
मृत अरुणा जाधव या अंजार पोलीस स्टेशनमध्ये एएसआय म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचा पार्टनर दिलीप जाधव हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) जवान असून, तो मणिपूरमध्ये तैनात आहे. दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि लवकरच लग्न करण्याचे त्यांनी ठरवले होते. अरुणा या लखतर तालुक्यातील डेरवाला गावच्या, तर दिलीप लिंबडी तालुक्यातील टोकरला गावचा रहिवासी आहे. दोघेही सुट्टीवर होते आणि शॉपिंग तसेच छोट्या सुट्टीसाठी अहमदाबादला गेले होते.
कच्छ पूर्वचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले की, ‘वादाच्या भरात जाधवने अरुणाचा गळा आवळून खून केला. आपण काय केले याची जाणीव झाल्यावर, त्याने चाकूने मनगट कापून आणि फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला उलटी झाली आणि तो वाचला. अंजारमधील गंगोत्री सोसायटीतील एका भाड्याच्या घरात ही घटना घडली, जिथे हे जोडपे राहत होते. शेजाऱ्यांनी शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास दोघांमध्ये मोठा वाद ऐकल्याचे सांगितले. आरोपी शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मृतदेहासोबत होता. त्यानंतर शनिवारी सकाळी दिलीप जाधव अंजार पोलीस स्टेशनमध्ये चालत गेला आणि त्याने खुनाची कबुली दिली.
अंजार पोलीस निरीक्षक अजयसिंग गोहिल यांनी सांगितले की, ‘दिलीपच्या कबुलीजबाबामुळे आम्हाला अरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. आम्ही पीडितेच्या कुटुंबियांना कळवले आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास सुरू आहे.’
दीराच्या प्रेमात वेडी झाली अन् नवऱ्याला संपवलं; चॅटींग व्हायरल…
सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
एकतर्फी प्रेम! मैत्रिणीने भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावलं अन्…
प्रेम! दोघे धायमोकलून रड-रड रडले अन् रेल्वेसमोर मारली उडी; एका क्षणात…
प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्…

