
जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…
पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर देशभरात चर्चेत आलेले लष्करातील माजी जवान चंदू चव्हाण आजही संघर्षातून मार्ग काढत उभे राहत आहेत. सीमारेषेवर सेवेत असताना झालेल्या चुकांमुळे ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले आणि तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांनी पाकिस्तानी कैदेत भीषण छळ सहन केला. या कालावधीतील त्यांच्या अनुभवांवर आधारित ज्येष्ठ पत्रकार संतोष धायबर यांनी लिहिलेले ‘जवान चंदू चव्हाण-पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने २१ दिवस’ हे पुस्तक देशभर गाजले आहे.
पाकिस्तानमध्ये ३ महिने २१ दिवस अमानुष छळ…
पाकिस्तानच्या कैदेत चंदू चव्हाण यांना किती अमानुष यातना सहन कराव्या लागल्या याची थरकाप उडवणारी माहिती त्यांच्या कथनातून समोर आली आहे. मानसिक आणि शारीरिक छळाच्या या काळात त्यांची जिद्द, देशभक्ती आणि मानसिक ताकद त्यांना आधार देत राहिली. भारत सरकारने सातत्यपूर्ण पाठपुरावा करत त्यांची सुटका केली आणि देशभरात सुटकेचा उत्सव साजरा झाला.
लष्करी बडतर्फी आणि आंदोलन…
भारतात परतल्यानंतर मात्र चंदू चव्हाण यांचे आयुष्य पुन्हा एकदा संकटात सापडले. लष्कराने त्यांना बडतर्फ केले. त्यांनी आंदोलन सुरू केले. मात्र आंदोलनाच्या वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना तब्बल चार महिने नाशिक कारागृहात राहावे लागले. या कठीण काळात भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाठे यांनी पुढाकार घेतला. तर अॅड. प्रकाश ताजनपुरे यांनी एकही पैसे न घेता त्यांची बाजू मांडली आणि अखेरीस चंदू चव्हाण यांना जामिन मिळाला.
कुटुंबाची जबाबदारी : दोन लहान मुलांसाठी मोठा निर्णय…
चंदू चव्हाण यांचे आई-वडिल लहानपणीच वारले. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आता त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर आहे. दोन लहान मुलांचे भविष्य घडवण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे ‘दोन्ही मुलांना लष्करात पाठवणार’. त्यांचा लढा लष्कराविरोधात नसून भ्रष्टाचाराविरोधात असल्याचे ते ठामपणे सांगतात.
१२ लाखांचे कर्ज आणि बँकेची नोटीस…
सध्या चंदू चव्हाण कुटुंब सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यांच्यावर साधारण १२ लाख रुपयांचे कर्ज असून, उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. बँकेकडून त्यांना नोटीस देण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. कुटुंबाची उपजीविका, मुलांचे संगोपण आणि घरखर्च अशा सर्व गोष्टींसाठी त्यांना आर्थिक हातभाराची नितांत गरज आहे. केवळ हातामध्ये पैसे नसल्यामुळेच वकिल देता आला नाही. यामुळे चार महिने कारागृहात राहावे लागले.
एक हात मदतीचा : नागरिकांकडून अपेक्षित साथ…
एका जवानाने देशासाठी सेवा केली, सीमारेषेवर अमानुष छळ सोसला, परत आल्यावर संघर्षांच्या जंजाळात अडकला, अशा या कुटुंबाला समाजाचा हातभार आता अत्यंत आवश्यक आहे. चंदू चव्हाण यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर जमा होणारी कोणतीही छोटी-मोठी आर्थिक मदत त्यांच्या आयुष्यातील संघर्ष हलका करू शकते. चंदू चव्हाण यांच्यावर बॅंक खाते सील असल्यामुळे त्यांनी पत्नीचे बॅंक खाते क्रमांक दिला आहे.
चंदू चव्हाण हे युवकांना घडविण्यासाठी, लष्करात जाण्यास मदत करण्यासाठी ऍकडमी उभी करणार आहेत. यासाठी सुद्धा आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आपला छोटासा हातभार एका कुटुंबाला पुन्हा आयुष्याकडे नेऊ शकतो. एका जवानाला परत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊ या.

आर्थिक मदतीसाठी संपर्कः
बॅंक खाते क्रमांक
Account Holder Name: GAYATRI CHANDU CHAVAN
Account Number: 924020025357201
IFSC Code: UTIB0000472
Bank Name: AXIS BANK (एक्सिस बैंक)
Branch Name: LALBAUG BRANCH, DHULE (Branch Code: 472)
– संतोष धायबर
santosh.dhaybar@gmail.com
लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाणला जामीन मंजूर…
चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन…
लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांना अटक…
माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…
लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?

