
लष्करातील सेवानिवृत्त सुभेदार हिम्मतराव भोईटे यांचे निधन
सुपे (अहिल्यानगर): लष्करातून सेवानिवृत्त झालेले सुभेदार हिम्मतराव भोईटे (वय ८४) यांचे सोमवारी (ता. ४) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, बहिणी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
घाणेगाव (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या गावातील हिम्मराव भोईटे हे १९६१ मध्ये लष्करात भरती झाले होते. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५ आणि १९७१च्या युद्धामध्ये ते प्रत्यक्षात सहभागी झाले होते. युद्धामध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल माजी राष्ट्रपती आर वेंकटरामन यांच्याकडून प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले होते. लष्करातील २८ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर १९८९ मध्ये आसाममधून ते सेवानिवृत्त झाले होते. लष्करातील आणि दोन्ही युद्धातील आठवणी ते नेहमी सांगत. युद्धामध्ये लढत असताना शत्रूवर केलेला हल्ला, गोळ्या अथवा बॉम्बचा अनुभव सांगायचे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती व्यवसायात लक्ष घातले होते. अल्पावधीतच प्रगतशील शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परिसरामध्ये नाना या नावाने ते परिचीत होते.
हिम्मतराव भोईटे यांचे सोमवारी निधन झाल्यानंतर मंगळवारी (ता. ५) घाणेगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घाणेगाव या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्या नानांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली. नाना यांनी संपूर्ण आयुष्यात अनेकांना मोलाचे सल्ले देतानाच कोणासोबतही भांडण केले नसल्याच्या अनेक आठवणी ग्रामस्थांनी सांगितल्या. नानांच्या निधनामुळे गावची मोठी हानी झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. प्रगतशील शेतकरी राजू आणि दिपक हे त्यांचे पुत्र होत तर आयटी इंजिनिअर आकाश भोईटे हे त्यांचे नातू होत. मुलांसोबत सून छाया आणि लता यांनी त्यांची मोठे सेवा केली. नाना यांनी कुटुंबाला बांधून ठेवले होते. नानांच्या सल्ल्यानंतर गावातील अनेक युवक लष्करात सहभागी झाले आहेत.
चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)
पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर…
भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…
Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…
India Vs Pak War : जवानांचा लढतानाचा Video पाहताना छाती येईल अभिमानाने भरुन…

