
महाराष्ट्राच्या सुपूत्राला जम्मू-काश्मीर सीमेवर वीरमरण…
कोल्हापूर : महाराष्ट्राचे सुपुत्र जवान रोहित परशुराम खन्नीकुडे (वय २७, रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हे जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना गुरुवारी (ता. १६) रात्री 12 वाजता एका अपघातात हुतात्मा झाले आहेत. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 2020 मध्ये भरती झालेल्या रोहित यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांनी बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीत भरती होऊन तिथेच प्रशिक्षण घेतले. सैन्यात भरती झाल्यानंतर अरुणाचल प्रदेश त्यानंतर चीन सीमेवरही ते कर्तव्यावर होते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांचा एक अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. रोहित यांच्या मागे आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. वडील परशुराम शेतकरी आहेत, तर आई गृहिणी आहेत. मुलगा गेला असला तरी देशासाठी प्राणार्पण केल्याने अभिमान वाटत असल्याच्या कुटुंबीयांच्या भावना आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
रोहित खन्नीकुडे यांच्या निधनाची माहिती मिळताच टाकळीवाडी गाव शोकमग्न झाले असून, जम्मू-काश्मीरमधून त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी येण्यासाठी निघाले असून रविवारी ते गावी दाखल होणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रोहित यांच्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या भूमीने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखित झाले आहे.
जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; 10 जवानांचा मृत्यू…
सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…
सातारा सुन्न! एकीकडे पत्नी बाळाला जन्म देत होती अन् दुसरीकडे जवानाचा मृत्यू…
अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

