पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर घातली बंदी; आदेश मोडल्यास…
पुणे : ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे अनेक नागरिक त्रस्त होतात. पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अधीन घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी फटाक्यांवर काही मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत. ध्वनी प्रदूषण करणारे, जास्त आवाजाचे […]
अधिक वाचा...पुणे! न्यायालयातून पलायन करणारा सराईत गुन्हेगार शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात…
पुणे : शिक्षेचा निकाल ऐकताच न्यायालयातून पलायन करणारा आणि पोलिसांना चकवा देत अनेक ठिकाणी लपून बसणारा सराईत गुन्हेगार अनमोल अतुल जाधवराव (वय ३६, रा. कोथरुड) याला शिवाजीनगर पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका फरार गुन्हेगारालाही अटक करण्यात आली आहे. अनमोल जाधवराव याच्यावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या (गु. […]
अधिक वाचा...पुणे शहरात अंमली पदार्थ टास्क फोर्सची स्थापना; पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे मागर्दशन व अपर पोलिस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे नियंत्रण व देखरेखीखाली तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे अधिपत्याखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) महाराष्ट्र राज्य, पुणे ची स्थापना करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा उददेश अवैध अंमली पदार्थ यांची विक्री, […]
अधिक वाचा...माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध…
मुंबई : वादग्रस्त माजी IAS अधिकारी दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी (ता. ६) बेलापूर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील आणि रबाळे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीप खेडकरला जामीन दिल्यास केसवर परिणाम होवू शकतो असा युक्तिवाद केला. मनोरमा खेडकरला जामीन मिळूनही तपासात सहकार्य करीत नसल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. यानंतर न्यायालयाने जामीनावरील निकाल 8 ऑक्टोबरपर्यंत […]
अधिक वाचा...गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पुणे पोलिसांनी धाड टाकून संपूर्ण घराची झडती घेतली. या झाडाझडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. पोलिसांना निलेश घायवळ याच्या घरी मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची कागदपत्रं, पासबुक आणि इतर साहित्य मिळाले आहे. जमिनींचे हे व्यवहार मराठवाड्यातील पवनचक्यांच्या जवळपासचे आहेत. त्याचबरोबर घायवळच्या घरातून पोलिसांना अनेक […]
अधिक वाचा...पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार…
पुणे: पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी ड्यूटी संपवून घरी जात असताना दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना लॉ कॉलेजरोडवर रविवारी (ता. ५) रात्री एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिस ड्यूटी संपवून घरी जात असताना रविवारी रात्री एकच्या सुमारास लॉ कॉलेजरोडवर दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनीट-3 मध्ये […]
अधिक वाचा...पुणे! वाघोली परसिरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मित्राकडूनच खून…
पुणे : वाघोली परिसरात शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार बादल शेख याचा त्याच्याच मित्राने खून केला आहे. या घटेनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. वाघोली पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. वाघोली परिसरातील प्यासा हॉटेलसमोर अचानक मित्राने केलेल्या हल्ल्यात बादल शेख गंभीर जखमी झाला आणि त्याच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिच्या चालकाचा वैद्यकीय अहवाल समोर…
पुणे: पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वाहनाने रिक्षाला जोराची धडक दिली होती. या घटनेत रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कार गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. शिवाय, वाहनाचा अपघात झाला त्यावेळी चालकाने मद्यपान केले होत का? अशी चर्चा होती. पोलिसांना गौतमी पाटील […]
अधिक वाचा...गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; पोलीस उपायुक्तांनी सांगितले कारण…
पुणे : पुणे शहरातील नवले पूला जवळ नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली आहे. रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांनी केलेले […]
अधिक वाचा...फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष…
पुणेः पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत सणासुदीच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिस दुर्लक्ष करत असल्याची तक्रार महिलेने केली आहे. पुणे शहरातील रविवार पेठ परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांकडून पर्स, मोबाईल फोन व दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या […]
अधिक वाचा...
