
पुणे शहरात अंमली पदार्थ टास्क फोर्सची स्थापना; पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे मागर्दशन व अपर पोलिस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे नियंत्रण व देखरेखीखाली तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे अधिपत्याखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) महाराष्ट्र राज्य, पुणे ची स्थापना करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा उददेश अवैध अंमली पदार्थ यांची विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या सर्वांवर प्रभावी फौजदारी कारवाई करणे तसेच अवैध अंमली पदार्थ सेवनाची सवय लागलेल्या व्यक्तींचे पुर्नवसन करणे तसेच अंमली पदार्थाच्या दुष्परिणामबाबत व्यापक जनजागृती करणे असा आहे.
दिनांक २२.०९.२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापुर कृती विभाग यांच्या पथकाकडुन पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत काळेपडळ पोलिस ठाणे हद्यीत अंमली पदार्थाची विक्री करणारे साहील शफीक शेख (वय २३ वर्ष रा. सय्यदनगर, हडपसर पुणे) व शाहाबाज जहिर खान (वय २३ वर्ष रा. सय्यदनगर, हडपसर पुणे) या दोघांवर कायदेशीर कारवाई करुन एक लाख साठ हजार रु. किंमती मेफेड्रोन (MD) नावाचा अंमली पदार्थासह मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सहा. पोलिस निरीक्षक माधवानंद धोत्रे हे पुढील तपास करीत आहेत.
२४.०९.२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापुर कृती विभाग यांच्या पथकाकडुन पुणे ग्रामीण हद्यीतील रांजणगाव पोलिस ठाणे अंतर्गत पुणे – अहिल्यानगर महामार्गावर अंमली पदार्थाची वाहतुक वाहतुक करणारे वासिम अब्दुल सय्यद (वय ३५ वर्ष), मुबशीर उर्फ जिमी मनसुन खान (वय २७), राहुल रामदास कनगरे (वय २६ वर्ष सर्वजण रा. दत्तनगर, राहुरी जि. अहिल्यानगर) यांचेवर कायदेशीर कारवाई करुन दहा लाख एकोणचाळीस हजार आठशे रु. किंमतीचा २५ किलो ६४२ ग्रम वजनाचा गांजासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन सहा. पोलिस निरीक्षक शिवाजी शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, नागरीकांना असे आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणची अवैध अंमलीपदार्थाची विक्री, साठा, वाहतुक किंवा तस्करीच्या अनुषंगाने कोणतीही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य विभागाच्या खालील नमुद क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित माहिती देणारे व्यक्तीचे नाव व संपर्क क्रमांक हा गोपनीय ठेवण्यात येईल.
१. नियंत्रण कक्ष व्हाटसअॅप क्रमांक ७२१८००००७३
२. ई-मेल आयडी spadmin-ant@mahapolice.gov.in
पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार…
पुणे! स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस…
गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….
पुणे! बंडगार्डन पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी…
Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…

