मंत्र्याच्या पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली…
अमरावती (आंध्र प्रदेश): एका मंत्र्यांची पत्नी पोलिस अधिकाऱ्याला नको नको ते बोलली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत.
केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झाल असून, त्याचवेळी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही लागले. केंद्रात मोदी सरकारने सत्ता टिकवली पण आंध्र प्रदेशात मात्र सत्ता बदल झाला. तिथे जगनमोहन रेड्डी यांचे सरकार जाऊन चंद्राबाबू नायडू पुन्हा सत्तेवर आले. चंद्राबाबू नायडू सरकारमधील एका मंत्र्याच्या पत्नीमुळे वाद निर्माण झाला आहे. मंत्री मंडीपाल्ली रामाप्रसाद यांच्या पत्नीने पोलिस अधिकाऱ्यावर राग काढला आहे. एका कार्यक्रमाला जाताना पोलिस अधिकाऱ्यामुळे थांबून रहावे लागल्यामुळे मंत्र्याच्या पत्नीने पोलिस अधिकाऱ्यावर राग काढला आहे.
अन्नामय्या जिल्ह्यात ही घटना घडली. हरीता रेड्डी एका स्थानिक कार्यक्रमासाठी चालल्या होत्या. कारच्या पुढच्या सीटवर त्या बसल्या होत्या. रमेश नावाच्या पोलिस निरीक्षकावर त्या चिडल्या होत्या. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पोलिस निरीक्षकामुळे अर्धातास थांबून रहाव लागले, असे हरीता रेड्डी यांचा दावा आहे. तिने पोलिस अधिकाऱ्याला अनेक प्रश्न विचारले आहेत.
‘सकाळ झाली नाही का? कुठली परिषद होती तुझी? लग्नाला आलायस की, ड्युटीवर? तुझ्यासाठी अर्धातास थांबून रहाव लागले. तुला पगार कोण देतो? सरकार की, YSRCP?’ अशा शब्दात मंत्र्यांच्या पत्नीने पोलिस अधिकाऱ्याला प्रश्न विचारले आहेत. पोलिस अधिकारी शांतपणे तिथे उभ राहून हे सर्व ऐकत होता. व्हिडिओच्या शेवटी पोलिस अधिकारी हरीता रेड्डीला सॅल्यूट करतो. तिच्या निर्देशानुसार ताफ्याच नेतृत्व करण्यासाठी पुढे निघून जातो.
पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…
धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…