
पत्नी आणि प्रियकराने मिळून पतीचा खून केला अन् मृतदेहाजवळच…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना हरदोई जिल्ह्यात घडली आहे. पतीला आपल्या पत्नीचं प्रियकरासोबत राहाणं खटकत होतं. यावरून दररोज वाद होत होते. अखेर पत्नीने प्रियकरासह मिळून शेतातच पतीची हत्या केली.
हरदोई जिल्ह्यातील लोणार पोलिस स्टेशन हद्दीतील भडना गावात ही घटना घडली. येथे 12 एप्रिल रोजी चुटकुन्नू याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत शेतात आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या हत्येनंतर लगेचच पत्नीने मृतदेहाजवळच प्रियकरासोबत मस्ती केली होती. आरोपी प्रियकर आणि त्याच्या पत्नीला अटक करून कारागृहात रवानगी करून कारवाई केली आहे.
हरदोईचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मार्तंड प्रकाश यांनी सांगितले की, ‘पोलिसांना मृत चुटकुन्नूच्या पत्नीचे कुटुंबातीलच मधुर पाल याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. सखोल चौकशी केली असता, मृताच्या पत्नीने सांगितले की, ती मधुरसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती. याबाबत पतीला आक्षेप होता. या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. गहू काढणीच्या बहाण्याने तिने पतीला शेतात नेले तिचा प्रियकर मधुर पाल तिथे आधीच उपस्थित होता. पती शेतात पोहोचताच मधुर पाल याने त्याच्यावर हल्ला केला आणि तो मरेपर्यंत मारहाण करत राहिला. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने मृतदेहापासून काही अंतरावर प्रियकरासोबत मस्ती केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.’
दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. याशिवाय पतीला ज्या रॉडने मारहाण करण्यात आली, तोही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात पाठवले आहे.
महाराष्ट्रात आईच्या नात्यालाच काळिमा! प्रियकरासाठी दोन मुलांची हत्या…
प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…
नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…
पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…
शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…

