छत्रपती संभाजीनगरमधील एशियन हॉस्पिटलमध्ये मोठी आग; ७ अर्भकांसह ५५ रुग्ण सुखरूप…

छत्रपती संभाजीनगरः छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी रोडवरील प्रसिद्ध एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री २.२७ वाजण्याच्या सुमाराला नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. एनआयसीयूतील एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन काही क्षणांतच आग आणि धुराचे लोट पसरल्याने, रुग्णालयात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यास प्राधान्य दिल्याने मोठा […]

अधिक वाचा...

कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप…

मुंबई: माटुंगा येथील एसएनडीटी महाविद्यावलयात कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महेश नवले याच्यावर, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी बुधवारी (ता. २) रात्री नवलेला ताब्यात घेतले असून, या प्रकारणाचा पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी नवलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी […]

अधिक वाचा...

संतापजनक! शाळेच्या स्कुल बसमध्ये चिमुकलीसोबत अश्लिल कृत्य…

पनवेल : एका शाळेच्या स्कुल बसमध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लिल कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे पनवेल शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बसचालकाला (वय ३०) अटक केली असून, पनवेल न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खासगी बसचा चालक होता. बुधवारी […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! वहिनी घरात एकटीच असताना दीर आला अन्…

कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे चुलत दिराने वहिनीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणात मृत पूजा दाभाडे हिचे पती अविनाश यांनी कोडोली पोलिसांत एकतर्फी प्रेमातून खून झाल्याची फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी सुरेश दाभाडे (वय 38) हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काखेपैकी शाहूनगर वसाहत येथील आरोपी सुरेश […]

अधिक वाचा...

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय…

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत दाखल असलेल्या याचिकेवर आज हायकोर्टाने आपला निकाल सुनावला. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर निकाल देताना सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात जबाब नोंदवावेत आणि सीबीआयने तपासाला सुरुवात करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, त्याच वेळेस […]

अधिक वाचा...

ब्लिंकइटच्या मुंबईतील गोदामात झुरळे व मुदतसमाप्ती झालेला माल व कीड लागलेली मिठाई…

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यभरात ठिकठिकाणी छापे घालण्याचे सत्र चालूच असून, मुंबईत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने मुंबईतील ब्लिंकइटच्या एका युनिटचा अन्न परवाना निलंबित केला असून, रिलायन्स रिटेलच्या एका आउटलेटचीही चौकशी चालू आहे. एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात […]

अधिक वाचा...

परवाना निलंबित, मालकाला तुरुंगवास… तरीही फटाक्यांचा कारखाना सुरूच; कौशांबीमधील ११ मृत्यूंसाठी जबाबदार कोण?

प्रयागराजः कौशांबीच्या पिपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून फटाक्यांचा एक बेकायदा कारखाना सुरू होता. कारखान्याला लागून असलेल्या घरावर दारूगोळ्याचा ढिगारा होता. फटाक्यांच्या निर्मितीसोबतच, त्यांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक आणि विक्रीही केली जात होती. गावातील बेकायदेशीर कारखाना, गोदाम आणि अवैध कारवायांकडे पोलिस आणि प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत राहिले. सोमवारच्या स्फोटात ११ जणांचा बळी गेल्यानंतरच जबाबदार अधिकारी […]

अधिक वाचा...

अकोल्यात विश्वासू हमालानेच मालकाला बांधून लुटले ५४ लाख…

अकोलाः सुमारे पाच वर्षांपूर्वी कामावर ठेवलेल्या एका हमालांनीच विश्वासघात करून दरोडा घातला. वरच्या मजल्यावर असलेल्या घरातून खाली दुकानात कामगारांना सूचना देण्यासाठी येण्याच्या तयारीत असतानाच, या हमालांनी घरात घुसून मालकाचे हात-पाय बांधले आणि सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे दागिने आणि ४ लाख रुपये रोख रुपये लुटून पलायन केले. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून दिल्लीत फेकून दिले…

नोएडाः उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील अकरावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची एक भीषण घटना घडली आहे. कौटुंबिक वादानंतर नोएडामधील आपल्या चुलत भावाच्या घरी जात असलेली ही पीडित मुलगी, रस्त्यात एकटी उभी असताना बस चालक आणि वाहकाने तिला लक्ष्य केले. दिल्ली आणि एनसीआर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालक कुलदीप आणि […]

अधिक वाचा...

गायक अंकित बालियान हत्याकांडातील 2 आरोपींचं एन्काऊंटर…

लखनौ (उत्तर प्रदेश): गायक आणि युट्युबर अंकित बालियान याच्या निर्घृण हत्या प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींचं एन्काऊंटर केले आहे. मारल्या गेलेल्या आरोपींची नावे सुमित आणि मोहित अशी असून ते हरियाणातील रहिवासी होते. या हत्येमध्ये एकूण चार शूटर आणि रेकी करणारे दोन असे एकूण सहा जण सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!