
अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खु) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या गावातीलच प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
विशाल जगन रंदई (वय 37) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर निलेश अरुण ढोणे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीशी दोन वर्षांपासून विशालचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात होती, तसा संशयही निलेशला होता. याच कारणावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते.

आरोपी अरुण ढोणे याने विशाल रंदई याला गावातीलच एका एकांत ठिकाणी भेटायला बोलावले. त्या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा होऊन वाद झाला. वादादरम्यान रागाच्या भरात आरोपीने लाकडी दांड्याने विशाल रंदईवर हल्ला केला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेला रंदई रक्ताच्या थारोळ्यात पडला. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास घाटंजी पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.
गौरी पालवे प्रकरण! अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीने जबाबात सांगितले…
पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…
नवऱ्याचे 19 महिलांशी अनैतिक संबंध, बेडरुमला स्पाय कॅमेरा लावला अन्…
अनैतिक संबंध! प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीला रिक्षात बसवलं अन्…
नवरा शारिरीक सुख देऊ शकत नव्हता अन् दीरासोबत अनैतिक संबंध…

