एसीपी भारत गायकवाड यांच्यासाठी पुतण्या मटण घेऊन आला अन् जीव गेला…

पुणे: सहायक पोलिस आयुक्त असलेले भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात कार्यरत होते. सोमवारी त्यांनी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले आणि स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

भारत गायकवाड (वय ५७) हे ४ जून २०२१ रोजी अमरावती पोलिस दलात पदोन्नतीवर रुजू झाले. ३१ मे २०२४ रोजी ते निवृत्त होणार होते. १५ जुलै रोजी ते सुटी घेऊन ते पुण्याला आले. सोमवारी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी त्यांनी पत्नी मोनी हिला गोळी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकून पुतण्या दीपक धावत त्यांचा खोलीकडे धावत आला. त्याने दरवाजा उघडला तर त्याला गोळी मारली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

दीपक गायकवाड पुण्यातच धायरीत राहतो. तर भारत गायकवाड यांचे कुटुंब बाणेरमध्ये राहतात. दीपक जेव्हाही काका येत होते, तेव्हा त्यांच्यासाठी मटण घेऊन येत होता. रविवारी रात्री २३ जुलै रोजी तो काकांसाठी मटण घेऊन आला होता. परंतु, पाऊस सुरु असल्यामुळे तो धायरीला परत न जाता थांबला. मग रात्री त्याठिकाणी झोपला होता. पहाटे ३ वाजेच्या सुमारास गोळीबाराचा आवाज ऐकून तो उठला आणि खोलीकडे धावला. परंतु, काकांनी त्याच्यावरही गोळी चालवली.

भारत गायकवाड यांचा मोठा मुलगा हर्षवर्धन हा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. लहान मुलगा सुहास हा हॉटेल मॅनेजमेंट करत आहे. रविवारी रात्री १० वाजता जेवण केल्यावर सर्व जण झोपले होते. पहाटे भारत यांच्या खोलीतून गोळीचा आवाज ऐकल्यानंतर सर्वांनी धाव घेतली. सुहासने दुसरी चावी आणत दीपकला दिली. दीपकने खोलीचे दार उघडताच त्यालाही गोळी मारली. सुहास आत आल्यावर तु बाहेर जा, नाहीतर तुलाही गोळी मारेल, असे सांगितले. त्यानंतर भारत यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

One thought on “एसीपी भारत गायकवाड यांच्यासाठी पुतण्या मटण घेऊन आला अन् जीव गेला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!