पुणे गँगवॉर! अक्षय म्हस्के हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पुणे: पुणे शहरात गँगवार पुन्हा उफाळून आला असून, अक्षय म्हस्के नावाच्या युवकावर गोळीबार केल्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेनं संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. हा गोळीबार वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या अवघ्या काही तासात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका अल्पवयीन मुलासह एकूण ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय म्हस्के याच्यावर बुधवारी सकाळच्या सुमारास काही गुंडांनी गोळीबार करत कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला अत्यंत पूर्वनियोजित होता. दोन वर्षात पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भरचौकात निर्घृण हत्या करण्यात आली होती. याच वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच बुधवारी अक्षय म्हस्के याच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे आंदेकर टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार नगर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. या गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी सध्या जेलमध्ये असलेला टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह मुलगा कृष्णा आंदेकर आणि अन्य सात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलमध्ये राहूनच या हल्ल्याची सूत्रे हलवण्यात आली होती का? मागच्या काही दिवसांत बंडू आंदेकरला भेटायला तुरुंगात कुणी आलं होतं का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेनंतर तातडीने कोंबिंग ऑपरेशन आणि तपास मोहीम राबवून सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. आफ्ताफ शरीफ सय्यद (धंदा. एसी काम, रा. भाग्यदेव नगर, वैशाली नर्सिंग होम, कोंडवा खुर्द), ऋषी प्रसाद मोहन आंबट (वय 21, धंदा. हमाल, रा. तालीम, नाना पेठ, नवरंग मित्र मंडळ जवळ, पुणे), आवेज अशपाक शेख, (वय 26, धंदा. मासे विक्री, रा. 271, गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय 19, रा. 60 भवानी पेठ, पालखी विठोबा चौक, पुणे) आणि अमन फारूक बागवाले (वय 21, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठ जवळ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी हे ‘आंदेकर टोळी’चे सक्रिय मेंबर आहेत. वनराज आंदेकरांच्या हत्येचा वचपा काढण्यासाठीच या टोळीने अक्षय म्हस्केच्या हत्येचा प्लॅन केला होता. अक्षय म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश म्हस्के याचा भाऊ आहे. आंदेकर टोळीकडून वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांची पाळत ठेवून हत्या केली जात आहे. यापूर्वी वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर, आणि समीर काळेचा भाऊ गणेश काळे याचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध? वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपीच्या भावावर झाडल्या गोळ्या…

पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…

आंदेकर X कोमकर! गणेश काळे हत्येबाबत पोलिस तपासात मोठी माहिती समोर…

आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…

आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!