बीड! प्रेयसीच्या दारात जाऊन खिडकीतून केला गोळीबार…

बीड : आंबेजोगाई तालुक्यामध्ये प्रेयसीने बोलणं बंद केल्याने थेट तिच्या दारात जाऊन खिडकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीच्या घरातील नागरिक दुसऱ्या खोलीत असल्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या घटनेनंतर पुन्हा एकदा बीडमधील शस्त्र परवाना आणि गावठी कट्टाचा मुद्दा समोर आला आहे. गणेश पंडित चव्हाण (वय 24) याने गोळीबार केला असन, पोलिसांनी […]

अधिक वाचा...

बहिणीवर प्रेम! मित्राचा खून केला आणि अंत्यसंस्काराला उपस्थितही राहिला अन्…

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका युवकाने आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला दारु पाजली आणि त्यानंतर खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रवीण अजाबराव संबारे (वय २७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. वैभव गोपाल सोनार (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. दोघंही एकमेकांचे मित्र होते. पण […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू…

अहिल्यानगर : लघु शंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. ईश्वरी पांडुरंग रोहकले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ईश्वरी ही वडिलांसोबत घराच्या पडवीत होती. त्यानंतर लघु शंकेसाठी बाजूला गेली असता मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत […]

अधिक वाचा...

बीड! मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू…

केज (बीड) : दोन कोटींच्या खंडणी प्रकरणाने संपूर्ण राज्यात आलेल्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह त्याच्या अन्य साथीदारांची खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असताना कामगाराचा मृत्यू झाल्याने परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. रचपाल हमीद मसीह या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला असून, पोलिस पुढील तपास […]

अधिक वाचा...

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…

पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज (शक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स […]

अधिक वाचा...

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) पहाटेच्या सुमारास घडली. घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञाताने सैफवर हल्ला केला. त्या रात्री नेमकं काय घडलं हे मोलकरणीने पोलिसांना जबाब नोंदवताना सविस्तर सांगितले आहे. मोलकरीण एलियामा फिलीपने (वय ५६) सांगितले, ‘गेल्या चार वर्षांपासून सैफच्या घरी स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. सैफ […]

अधिक वाचा...

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का? हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे. मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी 20 पथकं तयार केली होती. अभिनेता सैफ […]

अधिक वाचा...

बीड जिल्ह्यात किरकोळ कारणावरून दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या…

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना बीडमध्ये आता दुहेरी हत्याकांड घडले आहे. आष्टी तालुक्यातील वाहीरा गावात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पारधी समाजातील जमावाने हल्ला करत दोघांचा जीव घेतला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पारधी समाजातील तीन सख्खा भावांवर किरकोळ वादातून त्याच समाजातील जमावाने […]

अधिक वाचा...

सांगली जिल्ह्यात टोळक्याने केली मध्यरात्रीच्या सुमारास पहिलवानाची निर्घृण हत्या…

सांगली : सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कार्वे गावात एका पहिलवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी टोळक्याने गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पहिलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. राहुल गणपती जाधव (वय ३५) असे हत्या झालेल्या पहिलवानाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

संतापजनक! चिमुकलीवर 65 वर्षांच्या वृद्धाने बनवलं वासनेचा शिकार…

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षीय वृद्धाने 3 वर्षाच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिंबधक कायद्या अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश पुंडकर असे अत्याचार करणाऱ्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!