
संतापजनक! चिमुकलीवर 65 वर्षांच्या वृद्धाने बनवलं वासनेचा शिकार…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षीय वृद्धाने 3 वर्षाच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिंबधक कायद्या अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश पुंडकर असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलीच्या घराजवळ राहतो. चिमुकली मुलगी बुधवारी (ता. १५) आपल्या घरासमोर खेळत होती. यावेळी आरोपी पुंडकर त्याठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले होते. आपल्याला कुणी पाहत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीनं पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार केला.
संबंधित घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रकाश पुंडकर याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास येवदा पोलिस करत आहेत.
धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक…
धक्कादायक! मोबाईलच्या अतिवापर, तिसरीत शिकणाऱ्या मुलानं चिमुकलीवर अत्याचार…
धक्कादायक! चिमुकलीने काका घरी येत असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…
महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…
चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…

