बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू…
नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवतीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात पायल राजेंद्र चव्हाण (वय २०) हिचा मृत्यू झाला आहे. पायल चव्हाण हिच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी सातत्याने केली आहे. नाशिक-कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉललगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण येथे एकाने आपल्याच चुलतीचा खून करून बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता. तीन महिन्यानंतर त्याचे बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधातून आरोपीनेच चुलतीचा खून केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. अनिल धावडे आणि सतीलाल वाल्मीक मोरे असे […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू…
अहिल्यानगर : लघु शंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. ईश्वरी पांडुरंग रोहकले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ईश्वरी ही वडिलांसोबत घराच्या पडवीत होती. त्यानंतर लघु शंकेसाठी बाजूला गेली असता मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बिबट्या दिसल्याने स्नेहल हिने मारली विहिरीत उडी अन् गेला जीव…
जळगाव : तांबोळे (ता. चाळीसगाव) शिवारात शेतात कापूस वेचणी करत असताना बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून शेतातील मजुरांनी गावाकडे धाव घेतली. यावेळी घाबरलेल्या युवतीने विहिरीत उडी मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणी जास्त असल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चाळीसगाव ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे […]
अधिक वाचा...Video: बिबट्याने गाठले थेट पोलिस ठाणे अन् पकडली मान…
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात बिबट्याच्या मुक्त संचार वाढला असून, राजापूर तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्याच्या व्हरांड्यातुन बुधवारी (ता. २४) मध्यरात्री एका कुत्र्याच्या मानेला पकडून नेले आहे. संबंधित घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने थेट पोलिस ठाणे गाठल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याने राजापूर तहसील कार्यालय आणि […]
अधिक वाचा...
