अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) पहाटेच्या सुमारास घडली. घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञाताने सैफवर हल्ला केला. त्या रात्री नेमकं काय घडलं हे मोलकरणीने पोलिसांना जबाब नोंदवताना सविस्तर सांगितले आहे.

मोलकरीण एलियामा फिलीपने (वय ५६) सांगितले, ‘गेल्या चार वर्षांपासून सैफच्या घरी स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. सैफ अली खान यांचा धाकट्या मुलगा जहाँगीरची देखभाल करण्याचे काम पाहते. सैफ अली खान यांचे कुटुंब 11 व्या आणि 12 व्या मजल्यावर राहते. 11 व्या मजल्यावर 3 खोल्या आहेत. सैफ सर आणि करीना मॅडम एका खोलीत राहतात. दुसऱ्या खोलीत तैमूरचा रूम आहे, जिथे तैमूरची देखभाल करण्यासाठी गीता नर्स असते. जयबाबा तिसऱ्या खोलीत राहतो आणि त्याची देखभाल करण्यासाठी मी आणि जूनू असतो. जूनू नॅनी म्हणून काम करते.

मध्यरात्री दोनच्या सुमारास खुडखुडण्याचा आवाज ऐकू आला. बाहेर बघितलं तर दाराजवळील आणि बाथरूममधील दिवे चालू असल्याचे दिसले. करीना कपूर जेहला भेटायला आली आहे, असे वाटले म्हणून परत जाऊन झोपले. पण नंतर तिला वाटले की कोणीतरी आत येत आहे. करिना नाही तर दुसरं कोणीतरी आहे. पाहिले तर टोपी घातलेल्या एका माणसाची सावली दिसली. ती त्याला पाहायला गेली तेव्हा बाथरूममधून अज्ञात व्यक्ती बाहेर आला आणि जय बाबांच्या बेडजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. मी पटकन उठून जयबाबाकडे गेले. तेव्हा त्याने बोट तोंडावर ठेवून हिंदीत “नो साऊंड” असे धमकावले. त्याचवेळी जयबाबाची नॅनी जूनूही जागी झाली. तिलाही “कोई आवाज नहीं और कोई बाहर भी नहीं जाएगा” असे धमकावले.

मी त्याला विचारले, “तुला काय पाहिजे?” तेव्हा तो म्हणाला, “पैसे.” मी विचारले, “किती?” त्याने इंग्रजीत “वन कोटी” असे सांगितले. त्याच वेळी जूनूने संधी साधून जोरात ओरडत खोलीबाहेर धाव घेतली. तिच्या आवाजाने सैफ सर आणि करीना मॅडम खोलीत आले. सैफ सरांनी त्या व्यक्तीला विचारले, “कोण आहेस, तुला काय हवे आहे?” तेव्हा त्याने सैफ सरांवर हेक्सा ब्लेड आणि लाकडी वस्तूने हल्ला केला. गीता आत आली तेव्हा त्याने तिच्यावरही हल्ला केला. शेवटी सैफ सरांनी त्याला ढकलून बाजूला केले आणि आम्ही सगळे खोलीबाहेर पळालो आणि दरवाजा लावून घेतला.

एलियामाने सांगितलं आरोपीचं वर्णन पुढीलप्रमाणे…
अनोळखी पुरुष, अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, सावळा रंग, सडपातळ बांधा, उंची सुमारे 5 फूट 5 इंच, गडद रंगाचा शर्ट व पॅंट आणि डोक्यावर टोपी.

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…

अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!