अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का? हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे. मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी 20 पथकं तयार केली होती.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीला मध्यरात्री घरामध्ये सव्वा दोन ते अडीच्या दरम्यान एकाने हल्ला केला होता. त्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला होता. मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या शोधासाठी अनेक पथकं तयार केली होती. मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत वांद्रे पोलीस स्टेशनला नेले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती हाच आहे का? याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जाणार आहे.

सैफ अली खान याच्यावरी हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी अनेकांची चौकशी केली होती. वांद्रे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशीसाठी बोलावले आहे. फरार आरोपीसंदर्भात नवे धागेदोरे मुंबई पोलिसांना मिळतात का हे स्पष्ट होईल. आरोपीकडे फोन नसल्याची माहिती आहे. जर एखादा फोन असता तर तो नंबर ट्रेस करुन त्याच्यापर्यंत पोहोचता आले असते. हा जर सराईत गुन्हेगार होता तर काही अन्य गुन्ह्यांची उकल होऊ शकते. एका अभिनेत्याच्या घरी जाऊन हल्ला होत असल्याने पोलिसांवरील दबाव वाढला होता. आता मुंबई पोलिसांना यश आले असून त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी इमारतीच्या पायऱ्यांवरील एका सीसीटीव्हीत कैद झाला होता. याशिवाय वांद्रे रेल्वे स्थानकाच्या ब्रीजवरुन उतरताना देखील आरोपी सीसीटीव्हीत दिसला होता.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. चोराने सैफवर चाकूने सहा वार केले होते. यामुळे सैफला खोलवर जखमा झाल्या. सैफ अली खानला दहा सेंटीमीटर चाकूचा वार झाला आहे. त्यांच्या हातावर देखील वार करण्यात आले. हातावर रात्रीच हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली आहे. त्याच्या पाठीवर चाकू खुपसण्यात आला, त्याच्यावर स्पाइन सर्जरी करण्यात आली आहे.

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…

अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!