
पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…
पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज (शक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत.
संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये यात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान बाळाचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरून एसटीच्या मागे मॅक्स ऑटो जात होती. तर त्याच्या पाठीमागून आयशर टेम्पो प्रवास करत होता. आयशरने जोरात धडक दिल्याने मॅक्स ऑटो हा बसवर जाऊन आदळला. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्स ऑटो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरश हवेत उडवून थेट उभ्या असलेल्या बसवर धडकली होती.
आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवाशांमधील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर त्तकाळ नागरीकांनी धाव घेऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या जखमींवर उपचार सूरू आहेत. अपघाताच्या घटनेनंतर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी वाहने हटवून वाहतूकीला मार्ग मोकळा करून दिला आहे.
हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या IT मधील युवतीचा अपघाती मृत्यू…
पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…
ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू…

