कारने पाच युवतींना चिरडले; अंगावर काटा आणणारा Video…

मंगळुरु (कर्नाटक): एका भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या युवतींना चिरडले असून, या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अंगावर काटा आणणारा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फूटपाथवरून चालणाऱ्या पाच महिलांना भरधाव कारने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले […]

अधिक वाचा...

नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

पुणेः पुणे शहरातील नवले पुलाजवळ कंटेनरला धडक बसल्यानंतर ट्रकने पेट घेतला आणि त्याला आग लागली. या आगीत ट्रकच्या केबीनमध्ये बसून प्रवास करणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी (ता. १६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रक मक्याचा भुसा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. ट्रक नऱ्हे येथील स्वामी […]

अधिक वाचा...

मुंबई-गोवा महामार्गावर मोटार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू…

पनवेल: मुंबई-गोवा महामार्गावर देवीचं दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांची गाडी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पेण तालुक्यातील प्रसिद्ध खरोशी येथील केळंबा देवीचे दर्शन करून येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत ब्रीझा गाडीला अपघात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पुणे: पुणे शहरातील विश्रांतवाडी चौकात ऑईलच्या टॅंकरचा धक्का लागून दुचाकीवरील जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलींची आई गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साक्षी आणि श्रध्दा झा (वय साडेतीन वर्षे, रा.भोसरी) अशी मृत जुळ्या मुलींची नावे आहेत. त्यांची आई किरण झा (वय 38) अपघातात जखमी झाली आहे. याप्रकरणी […]

अधिक वाचा...

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

कराड (सातारा): पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून चारचाकीने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पोलिस कर्मचारी भाऊ-बहिणीसह भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. नितीन पवार (रा. कोल्हापूर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची बहीण मनीषा आप्पासाहेब जाधव आणि भाचा अभिषेक आप्पासाहेब […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील वैजापूर येथे दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू असून, २३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झालाआहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ रात्री 1 ते दीड वाजेच्या […]

अधिक वाचा...

हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ शुक्रवारी (ता. ६) रात्री एका मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. शिवाय, रस्त्यावरुन चालणाऱ्या पदचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तसेच चार जण जखमी झाले आहेत. मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) […]

अधिक वाचा...

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याच्या ‘स्वदेश’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी हिच्या मोटारीला इटलीमध्ये अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी गायत्रीसोबत तिचे पती विकास ओबेरॉयदेखील होते. गायत्री आणि विकास या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मात्र, दुसऱ्या कारमधील स्विस कपलचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्री गायत्री तिच्या पती विकास ओबेरॉयसह इटलीला फिरायला […]

अधिक वाचा...

भारतीय अब्जाधीश उद्योगपतीसह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू…

हरारे (झिम्बाब्वे) : भारतीय अब्जाधीश उद्योगपती हरपाल रंधवा आणि त्यांचा मुलाचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. दक्षिण-पश्चिम झिम्बाब्वेमधील हिऱ्याच्या खाणीत विमान कोसळून या भारतीय व्यावसायिकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. विमान हरारेहून मुरोवाला जात असताना अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले आणि अपघात झाला. विमानात चार परदेशी नागरिक होते आणि इतर दोघे झिम्बाब्वेचे होते. 29 […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीता चाहांदे (वय 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!