
ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…
रायगडः माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून, 55 जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव येथून बचाव पथके, रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात होती. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर कोंडेघर गाव हद्दीत बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात दोन महिलांचा मृत्यू आणि ५५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त शाळेच्या सहलीची बस पुण्याहून हरीहरेश्र्वर येथे पर्यटकांना घेवून येत असताना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.
ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी जखमींना मदत करत त्यांना रुग्णालयात हलवले. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवत पुन्हा वाहतूक सुरळीत केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…
अपघातानंतर धडक देऊन पळ काढल्यास कठोर शिक्षा: गृहमंत्री
हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…
नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…
हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

