
धक्कादायक Video: हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये झाली झिंगाट पार्टी अन् पुढे…
जयपूर (राजस्थान): एका हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी चार मित्रमैत्रिणींमध्ये झिंगाट पार्टी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमधून निघाले असताना वाटेत त्यांचे भांडण झाले. एका मित्राने एक युवती आणि तिच्या मित्राच्या अंगावर कार घातली. यामध्ये युवतीचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील जवाहर सर्कल ठाणे परिसरातील गिरधर मार्गावर ही घटना घडली आहे. तेथील एव्हरलँड विश हॉटेलमधून मंगेश अरोडा, राजकुमार जाट, उमा माथूर आणि आणखी एक युवती अशी चार जणं मंगळवारी पहाटे बाहेर पडले. त्यानंतर रस्त्यावर या चौघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर मंगेश अरोडा आणि एक युवती कारमध्ये बसले. त्यानंतर त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या राजकुमार आणि उमा यांच्या अंगावर कार घातली. या धडकेमुळे राजकुमार हा दूर जाऊन पडला. तर ही कार उमाच्या अंगावरून भरधाव वेगाने गेली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Disturbing Visuals ⚠️
Heart-wrenching incident from Jaipur, Rajasthan, The accused took the car back and hit both the girl and her friend, after which the girl died on the spot and the young man was injured. Such Crimes 😖🙏🏻https://t.co/xxgbrYhANIpic.twitter.com/p85PkiaKIa
— Anjana Om Kashyap AAJ TAK (Parody) (@AnjanaOK) December 27, 2023
दोघांच्या अंगावर कार घातल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान उमा नावाच्या युवतीचा मृत्यू झाला आहे. फरार झालेल्या युवकाचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या राजकुमार याने सांगितले की, ‘मंगेशने उमासोबत गैरवर्तन केले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. मंगेशने आधी त्यांना बेसबॉलने मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या अंगावर कार घातली.’
नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून; पण…
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत युवक-युवती पार्टी करून आले अन्…
धक्कादायक! दारू पार्टीदरम्यान मित्राचे गुप्तांग कापले अन् पुढे…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; विषारी सापांचं विष…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

