नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…

रांची (झारखंड) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या आदित्यपूरच्या ६ मित्रांच्या वाहनाला आज (सोमवार) सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, सहा मित्रांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बिष्टुपुरच्या सर्किट हाऊस एरियातील साइ मंदिर सर्कलजवळ अपघात झाला आहे. इंडिगो कारमधून ८ मित्र जात असताना मोटार खांबाला धडकली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्थानिकांनी सांगितले की, अपघातग्रस्त सर्वजण मित्र असून, रविवारी (ता. ३१) रात्री कॉलनीत पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर अचानक फिरायला जाण्याचे ठरवले. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. मृतांमध्ये छोटू यादव, हेमंत कुमार, सूरज कुमार, मोनू महतो, शुभम कुमार यांचा समावेश आहे. तर एकाची ओळख पटलेली नाही. हर्ष कुमार झा आणि रवी झा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना टाटा मुख्य रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आदित्यपूरमधील बाबाकुटी आश्रम येथे शोककळा पसरली आहे. मोटारीमधील सर्व तरुण बाबाकुटी आश्रम परिसरातील आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अहमदनगरमध्ये दर्शनासाठी जाताना भीषण अपघात; 3 ठार 8 जखमी…

साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 4 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!