पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…

नाशिक : देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुंदन सोनोने या अधिकाऱ्याचा गुरुवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुंदन सोनोने हे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्तव्य बजावून घरी जात असताना वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या टेम्पोचा सोनोने यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने ते खाली पडून गंभीर जखमी झाले. लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलला दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सोनोने कुटुंबासह पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मागील तीन महिन्यांपासून एपीआय पदावर कुंदन सोनोने (रा. इंदिरानगर) कार्यरत होते. दिवसभरातील कर्तव्य बजावून झाल्यानंतर ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने (एमएच-15-सीवाय-4140) घराकडे निघाले असताना अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नाशिक पोलिस दलामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. समोरच्या व्यक्तीला ते नेहमीच ‘बोला प्रभू’ असे म्हणत असत. त्यामुळे एक प्रकारे बोला प्रभू आवाज हरपल्याची भावना नाशिक पोलिस दलात व्यक्त होत आहे. ते 2000 सालच्या बॅचचे अधिकारी होते. गेल्या 23 वर्षांपासून ती पोलिस दलात कार्यरत होते.

पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!