पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
पुणे : पुणे विमानतळावर एका ७२ वर्षाच्या वृद्ध महिलेने माझ्याजवळ चारही बाजूला बॉम्ब आहेत, असे म्हणताच धावपळ उडाली. तपासादरम्यान या महिलेजवळ कोणतेही बॉम्ब नसून तिने अफवा उठवल्याचे समोर आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निता प्रकाश कपलानी असे या महिलेचे नाव आहे. विमानतळावर सेक्युरिटी चेकदरम्यान वेळ लागत असल्याने या महिलेनं चक्क विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आपल्याजवळ बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्या या महिलेविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निता प्रकाश कपलानी या महिलेला पुणे ते दिल्ली विमान प्रवास करायचा होता. दरम्यान, फिस्किंग बूथमध्ये सुरक्षा तपासणीसाठी पोलीस अधिकारी त्यांना तपासत होत्या. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने त्यांनी बॉम्बची अफवा पसरवली. ‘एवढं काय चेक करत आहात माझ्याजवळ चारही बाजूला बॉम्ब आहेत,’ असs त्यांनी एअरपोर्टवरील महिला पोलीस अधिकाऱ्यांना म्हटले. त्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. तपासादरम्यान या महिलेजवळ कोणतेही बॉम्ब नसून तिने अफवा उठवल्याचं समोर आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…
प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…