पुणे जिल्ह्यात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले एका गावात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना 18 /1/2024 ते 7/5/2024 दरम्यान घडली आहे. या प्रकरणाबाबत अल्पवयी मुलीने पारगाव पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. गोकुळ राठोड (रा. धुळे, पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना तिच्या कोपी मध्ये जाऊन तिला कॅडबरी खाण्यास देऊन, तू मला खूप आवडते, मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे, असे गोड बोलून बळजबरीने तिच्यासोबत संबंध ठेवले व नंतर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून या संबंधाबाबत कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली आहे. याबाबतचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उप निरीक्षक घोडके करत आहे.

पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…

पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!