चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…

पुणे (सुनिल सांबारे): चिखली पोलिसांनी वडोदरा (गुजरात) येथे जाऊन रावण टोळीतील मोका मधील फरारी आरोपीस बेडया ठोकल्या आहेत. यामुळे रावण टोळीला मोठा झटका बसला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्याचा समुळ बिमोड करण्याच्या पोलिस आयुक्ताच्या आदेशानुसार २०१७ पासून पोलिस आयुक्तालयात धुडगुस घालणा-या रावण गॅंगच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहिम सुरु केलेली होती. आत्तापर्यंत या कुप्रसिदध गॅंगच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मोरक्यावर १० मोका अन्वये कारवाया केलेल्या असून सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात जेरबंद आहेत.

चिखली परीसरात याच टोळीच्या करण रतन रोकडे व मुंग्या उर्फ़ रुतिक रतन रोकडे या भावानी आपली स्वतंत्र टोळी निर्माण करुन दहशत निर्माण केलेली होती. या दोघाच्या टोळी विरोधात आतापर्यंत खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चो-या, कोयत्याचा व अग्निशस्त्राचा वापर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत असे एकूण २१ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झालेले होते. यापुर्वीही करण रोकडे याच्यावर मोका अंतर्गत कारवाई केलेली होती तो सध्या जामिनावर होता. तर त्याचा भावु मुंग्या उर्फ़ रुतिक रतन रोकडे याच्यावर सन २०२१ मध्ये मोका अंतर्गत कारवाई केली असता त्यानी दहशतीचे जोरावर फ़िर्यादीस फितुर करुन मोकामधुन त्यांची सुटका करून घेतलेली होती. त्यानंतर त्यास मुंबई येथे तडीपार करण्यात आलेले होते.

परिसरात त्यांचे वर्चस्व कायम राहावे म्हणुन त्यांनी नियोजनबदध पदधतीने २२.०५.२०२३ रोजी दुपारी दोन वाजता चिखली कमानीसमोर भर चौकात गोळ्या झाडून सोन्या तापकीर नावाच्या २१ वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केलेली होती. गुन्हयाचा कट करुन त्यानुसार त्यांनी मध्य प्रदेशातुन पिस्टल विकत आणली होती. टोळीचा प्रमुख करण रोकडे याने त्याप्रमाणे सोन्या पानसरे व सिद्धार्थ कांबळे याना पिस्टल चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच त्याच्या मदतीला रिंकु यादव व मानव रोकडे यांना वॉचर म्हणुन ठेवुन गुन्हयाचा नियोजनबदध कटानुसार तो गोवा येथे निघुन गेला तर त्याचा भाऊ मुंग्या उर्फ़ रुतिक रोकडे हयास गोवंडी, मुंबई येथे तडीपार केलेले असल्याने तो मुंबई येथे निघून गेलेला होता. कटातील सहभागी असणारा तडीपार आरोपी सचिन गायकवाड हा सातारा येथे निघून गेला होता.

नियोजनानुसार घटना घडली त्यावेळेस आपण पुण्यात नव्हतो हे दाखविण्यासाठी घटनेच्या वेळेस ते पुण्यापासून दूर असणा-या गोवा, भांडुप पोलिस स्टेशन, सातारा पोलिस स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमे-याच्या खाली थांबून राहिलेले होते. तसेच त्यांचे वापरते मोबाईल हेही त्यांनी त्याच्या घरी चालू ठेवुन पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पुराव्याची लिंक जोडणे व त्याचा गुन्हयाचे कटातील सहभाग निष्पन्न करणे पोलिसासाठी मोठे अव्हान होते. आरोपी वांरवार त्याची राहण्याची ठिकाणे बदलत होते. मोबाईल सिम कार्ड दररोज बदलत होते. तसेच हॉटस अॅप, इंस्टाग्राम, पफ़ जी सारख्या सोशल मेडीयाचा वापर संपर्कासाठी करत होते. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना अवघड जात होते.

गुन्हा केल्यानंतर गोळीबार करणारे आरोपी सातारा येथे तडीपार आरोपी सचिन गायकवाड याच्याकडे गेलेले होते. तेथून त्यांना अटक करण्यात आली. तर मुख्य सुत्रदार आरोपी हे पळुन प्रथम गोवा नंतर सातारा, बारामती, वडोदरा, मध्य प्रदेश, मथुरा, शेवटी नेपाळ बोर्डरवर मधुबन उत्तर प्रदेश पर्यंत गेलेले होते. पोलिसांनी त्याचा पाठलाग शेवटपर्यन्त करुन शेवटी ते नेपाळ बार्डर जवळ मधुबन, उत्तर प्रदेश या ठिकाणी नेपाळमध्ये पळुन जाण्याच्या तयारीत असताना गुंडा विरोधी पथकाचे स.पो.नि. हरिष माने व पथकाने त्याना मोठ्या जिगरीने ताब्यात घेतले.

गुन्हयाचे कटात सहभागी असणारा आरोपी कपिल उर्फ़ विजय दिपक लोखंडे हा गुन्हया घडल्यापासून फरारच होता. प्रथम त्याचे लोकेशन तडीपार आरोपी सचिन गायकवाड यांचे सोबत सातारा परिसरात आलेले होते. त्यानंतर पाटस व नंतर सिन्नर व शेवटचे लोकेशन त्याचे राहते घरी वडोदरा गुजरात येथे आलेले होते. त्यानुसार एक पोलिस पथक वडोदरा गुजरात येथे पाठविले असता तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झालेला होता. तेव्हापासून चिखली पोलिस स्टेशनचे पोलिस त्याच्या मागावर होते. २८.०७.२०२३ रोजी कपिल लोखंडे याने इंस्ट्राग्राम वरुन चिखली परीसरात राहणारी त्यांचे मैत्रीणीला संपर्क केल्याचे पोलिसाचे तात्रीक विश्लेषणात दिसून आले.

चिखली पोलिस स्टेशनचे पोलिसांनी तात्काळ त्याच्या मैत्रीस ताब्यात घेवून तिच्या माध्यमातून पाहिजे आरोपी कपिल लोखंडे याचाशी संपर्क चालू ठेवला. पोलिस उप निरीक्षक बारावकर यांचे पथक त्यानुसार पाठवून त्याचा माघ काढत वडोदरा, गुजरात येथे जावुन तेथील स्थानिक मकरपुरा पोलिस स्टेशनची मदत घेवून त्यास ताब्यात घेतलेले आहे. अश्या प्रकाराने दाखल गुन्हयात एकूण १२ आरोपींना अटक करुन त्याच्याविरोधात मोका अंतर्गत कारवाई करुन चिखली पोलिस ठाण्याचे पोलिसांनी चिखली परीसरातील रावण गॅगची दहशत मोडीत काढलेली आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनोय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरीक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी सो, पोलिस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलिस आयुक्त पदमाकर घनवट याच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ट पोलिस निरीक्षक, श्री. ज्ञानेश्वर काटकर, पो. नि. भानुदास बर्गे, स.पो. नि. तोफ़िक सय्यद, पोलिस उप निरीक्षक पुजारी, कुमटकर, बारवकर, सहा. पो. उप नि वडेकर, पो.ह. ९६२ नागरे, पो.ह. २९३१ तारळकर, पो.ह. ११३३ साकोरे, पो.ह.४१४ जाधव, पो.ना. १८५६ पिंजारी व पो.शि. २९१५ केदार पथकाने केलेली आहे. विशेष तात्रीक सहाय्य नागेश माळी यांनी केलेले आहे.

पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!