पुणे शहरात पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; गुन्हा दाखल…
पुणे : इमारतीचे बांधकाम सुरू असताना पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकात घडली आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी बांधकामाच्या ठिकाणी क्रेन यंत्रणा उपलब्ध करून देणारी कंपनी, तसेच ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
चंद्रा कुबेर पात्रा (वय २०) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ऑरेंज मशिन टेक प्रा. लि.चे संचालक आणि ठेकेदार प्रवीण नाथा कोदरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेश दासा पात्रा (वय ३५) याने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पुणे शहरातील शंकरशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकात (सेव्हन लव्हज् चौक) सुयोग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून गृहप्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. ठेकेदार प्रवीण कोदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रा पात्रा बांधकामाच्या ठिकाणी लावलेल्या टॉवर क्रेनचे काम करत होता. त्यावेळी पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने चंद्रा याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर पुढील तपास करत आहेत.
प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पुणे शहरात वाहनचालकाला फिट आल्याने आठ वाहनांना धडक…
पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…
पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…
पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…
पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…