वडिलांना मारल्याचा वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
नाशिक : पंचवटी परीसरात असलेल्या मखमलाबाद नाका येथे कुसुमाग्रज उद्यान जवळ एका युवकावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय 28, रा. मखमलाबाद नाका) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.
सागर विष्णू शिंदे याचे याच परिसरात राहणाऱ्या केदार साहेबराव इंगळे याच्याशी वाद झाले होते. सागर शिंदे व त्याचा मित्र आकाश इंगळे, योगेश वाघ हे शुक्रवारी (ता. १३) दुपारी याच परिसरातील एका बंद गोडाउनजवळ बसून मद्यपान करीत होते. ही माहिती केदार साहेबराव इंगळे यास समजताच इंगळे याने ऋषिकेश आहेर व अन्य काही मित्रांसह गोडाउनजवळ धाव घेतली. यावेळी सागर शिंदे आणि इंगळे यांच्यात बाचाबाची होऊन सागरवर चाकूहल्ला करून हल्लेखोर टोळके पसार झाले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागरचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मृत सागर शिंदे याचे मारेकरी केदार इंगळे यांच्या वडिलांची वाद झाले होते. या वादात सागर शिंदे यांनी केदार इंगळेच्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे. वडिलांना मारहाण केल्याचा राग मनात धरून केदार इंगळे आणि त्याचे इतर अन्य साथीदारांनी सागर शिंदे याच्यावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात सागर शिंदे याच्या मानेवर आणि तोंडावर वार करण्यात आले आहे. वर्मी घाव लागल्याने सागर शिंदे याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या हल्ल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत मुख्य संशयित आरोपी केदार साहेबराव इंगळे याच्यासह ऋषिकेश आहेर दीपक दगळे, नुकुल चव्हाण या चार आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासात गजाआड केल्याची माहिती पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…
नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…
Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन; निट रहा नाहीतर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!