विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…

पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास गजाआड केले असून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

विमानतळ पोलिस ठाणेचे हददीत अलीकडील काळामध्ये दुचाकी चोरीच्या घटना वारंवार होत असल्याने पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी विलास सोंडे यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पोलिस ठाणे हददीत गस्त करुन दुचाकी चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेणेबाबतच्या सुचना वेळोवळी दिलेल्या होत्या. २५/०७/२०२३ रोजी कोंबिग ऑपरेशनचे अनुषंगाने पोलिस स्टेशनचे हद्दीत विमानतळ पोलिस ठाणेचे तपास पथक हददीत गस्त करीत असताना, बर्मासेल लोहगाव परीसरामध्ये एका संशयितास सपोनि विजय चंदन व पोउनि रविंद्र ढावरे यांचे पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने त्याचे योगेश संजय गालीकर (वय २६ वर्षे रा. गल्ली नं ७ विजयनगर चौधरी पार्क दत्तनगर दिघी पुणे मुळगाव मु पो साकेगाव ता. भुसावळ जि. जळगाव) असे असल्याचे सांगितले.

योगेश संजय गालीकर याच्याकडे मिळून आलेल्या वाहनाबाबत चौकशी केली असता सदरची होंडा शाईन MH12 MC 2830 ही गाडी सिग्नेचर हॉटेल विमाननगर पुणे येथुन चोरीस गेलेले निष्पन्न झाले. त्याचेकडे अधिक तपास करता त्याने विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये ०४ दुचाकी व दिघी, पिंपरी चिंचवड येथील ०१ दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून २,५५,०००/- रुपये किंमतीच्या एकुण ०५ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अटक आरोपीचे पुर्वाभिलेखाची पाहणी केली असता त्याच्यावर सुरत, गुजरात येथे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदिप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर रंजन कुमार शर्मा अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, शशिकांत बोराटे, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर, संजय पाटील सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये विलास सोंडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस उप निरीक्षक, रविंद्र ढावरे, पोलिस स्टाफ अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन जाधव, सचिन कदम, ज्ञानेश्वर आवारी, सचिन जगदाळे यांचे पथकाने केली आहे.

पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…

सराईत गुन्हेगार वैभव इक्करची हवेली पोलिसांनी काढली धिंड…

पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना युनिट २ने केले जेरबंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!