हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप…

मुंबई: अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचं विमान क्रॅश झाले असून, या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आता २७९ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये प्रवासी आणि मेडिकल कॉलेजच्या चार एमबीबीएस विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मृतांमध्ये एअर होस्टेस रोशनी सोनघरे (वय २७) हिचा समावेश आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

रोशनीचे लग्न ठरले होते. नोव्हेंबरअखेर साखरपुडा आणि मार्चमध्ये लग्न असे नियोजन होते. डोंबिवलीच्या रोशनीने गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे ड्रीमलायनरमधून उड्डाण केले होते. इंटरनॅशनल विमानात सेवा देण्याची ही पहिलीच संधी, ही संधी तिची अखेरची ठरली आणि डोक्यावर अक्षता पडण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला.

डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ येथील नव उमिया कृपा सोसायटीत रोशनी सोनघरे ही तिच्या कुटुंबासह राहत होती. मूळचे ग्रॅण्ट रोडचे असलेले सोनघरे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झाले होते. मुंबईतील एका युवकासोबत तिचे लग्न ठरले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. लहानपणापासून एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या रोशनीने ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही साकारले होते. सुरुवातीला स्पाईस जेट व त्यानंतर एअर इंडियात ती भरती झाली होती. गुरुवारी अहमदाबादमधून टेकऑफ घेतलेल्या ड्रीमलायनर विमानात तिची पहिलीच आंतरराष्ट्रीय ड्युटी. त्यामुळे ती प्रचंड खुशीत होती. पण विमान दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला आहे.

रोशनीने सोशल मीडियावर ‘स्काय लव्ह हर’ या नावाने आपली ओळख निर्माण केली होती. ती सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर होती. इन्स्टाग्रामवर तिचे 60 हजार फॉलोअर्स होते. ‘स्काय लव्ह हर’ या युजर नेमने ती विमान प्रवास, सौंदर्य, जीवनशैली आणि तिच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित व्हिडीओ शेअर करीत असे. तिच्या निधनामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…

हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…

विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…

अहमदाबाद ते लंडन विमानातील कुटुंबाचा सेल्फी ठरला शेवटचा…

अहमदाबाद विमान अपघात! जळालेले मृतदेह अन् पायलटचा शेवटचा मेसेज…

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…

स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!