
अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…
लातूर: एका अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदुर्गा (ता. औसा) गावात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुर्गा गावातील एका दहा वर्षीय मुलगी दररोज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिकवणीला जात असते. मुकेश अंबाजी बनसोडे (वय ३३) याने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आणि पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायती जवळ असलेल्या रिकाम्या गोदामात अत्याचार केला. शिवाय, याबाबत कोणाला सांगितले तर खल्लास करतो, अशी धमकी दिली होती.
दरम्यान, पीडित मुलीने घाबरल्यानंतर याबाबत कुटुंबियांना सांगितले. यानंतर किल्लारी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कलम ३७६ (२) (एन) भादंवि, ४, ६, ८, १२ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक ढोणे करत आहेत.
विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…
औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…
हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…