माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…

मुंबई : एका ३९ दिवसांच्या चिमुकलीची तिच्या आईनेच 14व्या मजल्यावरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता तू न वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे.

एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकलेली चिमुकली दुकानावर पडली. गुरुवारी (ता. २१) सकाळी ही घटना उघडकीस आली. हत्या करणारी आई ही तिच्या वडिलांच्या निधनानंतर मानसिक तणावात होती. यानंतर ती बाळाला तिचे आजोबा बोलावत आहेत, असेही सतत बडबडायची. यानंतर आता तिने चिमुकलीची अशी हत्या केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

मुंबईत मुलुंडमधील निळकंठ अपार्टमेंटमध्ये मनाली मेहता ही महिला आपल्या माहेरी राहत होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर ती मानसिक तणावाखाली होती. आजोबांचे त्यांच्या या चिमुकल्या नातीवर प्रेम होते. बाळाला पाहताच मनालीला तिच्या वडिलांची आठवण येत असे. बाळाला आजोबा बोलावतायत असे ती सतत कुटुंबियांना सांगायची. त्यावेळी कुटुंबीय तिची समजूत काढायचे.

गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मनालीने बाळाला १४ व्या मजल्यावरून खाली फेकले. इमारतीच्या खाली असलेल्या छतावर बाळ पडले. एका रहिवाशाला छतावर मुलीचा मृतेदह असल्याचे दिसल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असन, पोलिस पुढील तपास करत आहेत.

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!