मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. वांद्रे परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने युवतीला चिरडले आहे. मॉडेल शिवानी सिंग (वय २५) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. शिवानी ही तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना पाठी मागून आलेल्या एका टँकरने तिला चिरडले. या अपघातानंतर टँकर चालक फरार झाला.

वांद्रे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. तेव्हा भरधाव वेगाने येणारा पाण्याचा टँकर समोरून आला आणि त्याने दुचाकीला धडक दिली. शिवानी बाईकवर मागे बसली होती. टँकरची धडक बसताच शिवानी दुचाकीवरून पडली आणि टँकरच्या चाकाखाली आली. या घटनेत गंभीर जखमी झाली होती. नागरिकांनी तिला तात्काळ भाभा रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघात झाल्यानंतर टँकर चालकाने उडी मारून पळ काढला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, शिवानी सिंग हिने करिअरला नुकतीच सुरुवात केली होती. शिवानीने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. तिच्या करिअरमधला हा पहिला आंतरराष्ट्रीय शो होता. बिग बॉस ओटीटी-2 ची स्पर्धक आशिका भाटियानेही शिवानीच्या मृत्यूबद्दल पोस्ट केली आहे.

हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू…

बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…

हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…

हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…

पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!