पुणे हादरलं! नवऱ्याने चिमुकल्यासमोरच केली पत्नीची हत्या अन् मृतदेह दुचाकीवर घेऊन…

पुणे: पुणे शहरातील नांदेड सिटी जळ घरगुती वादातून नवऱ्याने आठ वर्षाच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना त्याला पोलिसांनी पकडले. मात्र, चिमुकल्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

राकेश राम नाईक निसार असे आरोपीचे नाव आहे, तर बबीता निसार असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. स्वयंपाक करण्यावरून आणि घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून नवऱ्याने आपल्या आठ वर्षाच्या मुलासमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कापडात गुंडाळला आणि विल्हेवाट लावण्यासाठी रात्री दीडच्या सुमारास दुचाकीवरून घेऊन निघाला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्यानंतर चौकशी केली. पोलिसांना सुरवातीला त्याने उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र, आठ वर्षाच्या मुलाजवळ चौकशी केली असता खरी माहिती समोर आली.

आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेश निसार याला पकडले आणि सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. राकेश धायरी परिसरात आपल्या कुटूंबासह वास्तव्यास असून, तो मजुरी काम करतो. रात्री एक वाजताच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर समोरून भुमकर पूलाजवळ नागरिकांना एक व्यक्ती संशयितरित्या गाडीवरून काहीतरी घेऊन जात असल्याचे पाहिले आणि त्यानंतर त्या स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी भुमकर पुलाजवळ बीट मार्शल पोहोचले आणि त्याला पकडले असता त्याने गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीट मार्शलने या राकेशला पकडले आणि त्यावेळी राकेश कडे चौकशी करायला सुरुवात केली.

आरोपी राकेश याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मित्राने हा मृतदेह मागवला आहे, त्याला खेडशिवापूर जवळ नेऊन देतो असे त्याने सांगितले. मृत पत्नीने फाशी घेतली असल्याचेही त्याने आधी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांना पुन्हा संशय बळावला आणि त्याच्याकडे पुन्हा विचारणा सुरू केली. नंतर पोलिसांनी थेट राकेशला घेऊन त्याचे धायरीतले घर गाठले, तेव्हा राकेश आणि बबिता यांचा आठ वर्षाचा मुलगा घरी झोपलेला दिसला. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता मुलांनी थेट पोलिसांना वडिलांनीच आईला मारून टाकल्याचं सांगितले. आई आणि वडिलांमध्ये जेवणाच्या कारणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून कायम वाद व्हायचे, आज वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर बाबांनीच आईला गळा दाबून मारून टाकल्याचे चिमुकल्याने सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा आरोपी राकेश याने पत्नी बबीताची गळा दाबून हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो दुचाकीवरून प्रवास करत होता. पत्नीचा मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला बेड्या ठोकल्या.

मध्यरात्री दीड वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीने पत्नीची हत्या नेमकी का केली? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

पुणे शहरात मैत्रिणीने कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून केला विश्वासघात…

पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…

पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!