अहमदनगर जिल्हा हादरला! पतीला झोपेच्या गोळ्या खावू घातल्या अन् पुढे…

अहमदनगर: घरावर दरोडा पडल्याचा बनाव करत पत्नीनेच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावात गुरुवारी (ता. २१) पहाटे नईम पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून पाच जणांनी त्यांची हत्या केल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांनी तपासाला सुरवात केल्यानंतर नईम पठाण यांची हत्या दरोडेखोरांनी नाही तर त्यांच्याच पत्नीने केल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

बुशरा पठाण असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने पतीला आधी झोपेच्या गोळ्या खावू घातल्या, त्यानंतर पतीचा साडीने गळा आवळत हत्या केली. हत्येचे प्रकरण दडपण्यासाठी तीने दरोड्याचा बनाव केला. पण, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपी पत्नीला अटक केली आहे. सातत्याने होणाऱ्या शारीरिक अत्याचाराला कंटाळून बुरशा पठाण हिने आपल्या पतीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंदिरातील फोडल्या चार दानपेट्या…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!