मित्राने व्यावसायिकाच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी अन्…

मुंबई: पवई परिसरातील एका व्यावसायिकाला त्याच्या मित्राने ब्लॅकमेल करत तब्बल ८० लाखांची खंडणी मागितली आहे. शिवाय, आरोपीनं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाच्या पत्नीकडेही शरीरसुखाची मागणी केली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जॉन परेरा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी परेरा हा मागच्या सहा महिन्यांपासून पवईतील व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता. आरोपी परेरा हा पीडित व्यावसायिकाचा मित्र आहे. त्याच्याकडे व्यावसायिकाचे काही अश्लील व्हिडीओ होते. ज्यात व्यावसायिकाची पत्नी आणि त्यांच्या मैत्रिणीचे देखील काही आक्षेपार्ह फोटोज आरोपीकडे होते. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीकडून दिली जात होती.

आरोपीने संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडे तब्बल ८० लाखांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीत तर सर्व खासगी फोटो तक्रारदार व्यावसायिकाच्या नातेवाईकांच्या आणि ऑफिसच्या ग्रुपवर व्हायरल करू, अशी धमकी आरोपी देत होता. आरोपी व्हॉट्सअॅपवरून कॉल करून ब्लॅकमेल आणि धमकी देत होता.

आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पवई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या विविध कलमांतर्ग गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा अंधेरी परिसरात घडल्याने पवई पोलिसांनी हे प्रकरण डी एन नगर पोलिसांकडे वर्ग केला आहे. याबाबतचे काही पुरावेही पोलिसांनी डीएन नगर पोलिसांना दिले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…

पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी…

प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच…

‘प्रेमात माझी वाट लागली’, स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…

मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!