उरणमध्ये पुन्हा खळबळ; एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला…

मुंबई : नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणाने खळबळ उडाली असताना न्हावे गावातील एका युवतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाने एकतर्फी प्रेमातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

न्हावे गावातील प्रितम अरुण म्हात्रे याने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या (वय २४) डोक्यात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला आहे. युवती गंभीरीत्या जखमी होऊन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. युवतीला दोन वर्षांपूर्वी प्रीतम म्हात्रे याने प्रपोज केले होते. युवतीने नकार दिला होता.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

युवतीने नकार दिल्याचा राग मनात ठेऊन न्हावे गावाजवळ माणिकटोक समुद्रकिनारी 26 जुलै रोजी युवती आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी करत बसली होती. प्रीतम म्हात्रे हा तिथे पोचला. त्याने काही कळण्याच्या आताच लोखंडी सळईने तरुणीच्या डोक्यात व पाठीवर जोरदार हल्ला केला. त्यामुळे युवतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. युवतीच्या डोक्याला 10 टाके पडले असून ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी प्रीतम म्हात्रेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…

पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!