आई आणि भावाच्या हत्येचा उलडगा; काजल निघाली समलैंगिक…

चंदीगड (हरियाणा): आझाद नगर येथील एका घरात आई आणि मुलाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलगी काजल (वय २७) बाहेर असल्याने ती बचावली. मृतांमध्ये मीना (वय ४५) आणि मुलगा राहूल (वय २३) यांचा समावेश आहे. सुरुवातीला पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्याचा संशय आला. पण, पोलिसांना हत्येचा उडगडा करण्यात यश आले आहे.

काजल दुपारी चार वाजता जेव्हा मुलगी घरी आली तेव्हा आई आणि भावाचा मृतदेह पाहून धक्का बसला. मृतदेह पाहून तीने आरडाओरडा करत शेजारच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर 112 नंबरवर फोन करत पोलिसांना याची माहिती दिली. मोबाईल चार्जिंगच्या वायरने गळा आवळून या दोघांची हत्या करण्यात आली होती.

policekaka-special-offerपोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

हत्याकांडाची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरु केला. विशेष म्हणजे घटनेच्याच दिवशी घरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुलगी काजलकडे चौकशी सुरु केली. घटना घडली त्यावेळी आपण ब्युटी पार्लरला गेलो होतो, येताना आईने मेसेज करत ज्युसची दोन पाकिटं आणण्यास सांगितले होते, अशी माहिती काजलने दिली. आईने पाठवलेला मेसेजही काजलने पोलिसांना दाखवला.

हत्याकांडाच्याच दिवशी घरातील सीसीटीव्ही बंद कसा होता, ही गोष्ट पोलिसांना खटकली. त्यांना याबाबत काजलला विचारलं, पण सीसीटीव्ही कोणी आणि का बंद केला याची आपल्याला काहीच माहित नसल्याचे तीने सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. यात तोंडावर मास्क बांधलेला एक युवक त्यांच्या घरी जाताना आणि निघताना दिसला. विशेष म्हणजे त्यावेळी काजलही घरातच होती. घरात घुसलेला हा तरुण कोण होता? याची पोलिसांनी विचारणा केल्यावर काजल गडबडली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभव पाहिल्यानंतर पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला.

काजल खोटं बोलत असल्याची पोलिसांना खात्री पटली. तिला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच काजलने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या मामेभावाला सोबत घेत काजलने आई आणि भावाची हत्या केली होती. काजल आणि मामेभाऊ कृषने मोबाईल चार्जरच्या वायरने आधी राहुलची नंतर आई मीनाची गळा आवळून हत्या केली. कृषने चार्जने गळा आवळला तर काजलने त्यांचे पाय पकडले. त्यानंतर चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचे भासवण्यासाठी त्याने घरातील साहित्य विखरले. हत्याकांडाच्या आधी काजलने घरातील सीसीटीव्ही बंद केला होता. काजल समलैंगिक होती, तिचं एका मुलीबरोबर समलैंगिक संबंध होते. एकत्र राहाता यावे यासाठी काजलने पुढाकार घेत त्या मुलीचे भाऊ राहुलबरोबर लग्न ठरवले. पण राहुलला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने हे लग्न मोडले. यावरुन काजल हिचे आई मीना आणि भावाबरोबर भांडणं वाढू लागली. दररोजच्या भांडणांना कंटाळून काजलने दोघांच्या हत्येचा कट रचला. यात तीने मामेभाऊ कृषलाही सहभागी करुन घेतले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

युवती मुलाप्रमाणे वावरायची हे आई आणि भावाला खटकले अन्…

घराशेजारी राहणाऱ्या महिलेसाठी बनली पुरुष अन् फसवलं…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!