प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…

सांगली: मांगले (ता. शिराळा) येथील तुषार पांढरबळे या युवकाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील भेंडवडेमध्ये वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून शनिवारी (ता. ५) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरुन वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती.

प्रेम प्रकरणातून मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत त्याने उडी घेतली होती. नदीचे पाणी पात्राबाहेर असल्याने शनिवारी रात्र झाल्याने शोध घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी एनडीआरएफच्या 20 जणांच्या पथकाने शोध सुरु केला. दरम्यान, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पातळी कमी झाली होती. पाण्याची पातळी सुमारे सात फुटांनी कमी आल्याने पाणी पात्रात गेले होते. तुषारचा मूळ ठिकाणापासून तब्बल 40 किमी दूर वारणा नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला आहे. डॉक्टरांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री त्याच्यावर बिळाशी या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. तो मांगलेमध्ये आजोळी आईसह रहात होता. वारणा नदीत उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहिन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता.

तुषार 6 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास मांगले सावर्डे बंधाऱ्याकडे तुषार गेला. त्याचे बंधाऱ्यावर बराच वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरु होते. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली. त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तो दिसेनासा झाला. मांगल्याचे पोलिस पाटील संजय कांबळे यांनी घटनेची माहिती शिराळा पोलिस ठाण्यात दिली होती.

प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…

नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…

महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!