पुणे शहरात गोळीबार करून खून करणाऱ्या तिघांना युनिट १ने घेतले ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात खुनासारख्या गंभीर गुन्हयातील ०३ आरोपींना १२ तासामध्ये युनिट १ गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
श्रीकृष्ण हाईटस घोरपडी पेठ येथे ३०/१०/२०२३ रोजी अनिल रामदेव साहु (वय ३५) यास दोन अनोळखी व्यक्तींनी बंदुकीतुन गोळ्या घालून जीवे ठार मारले होते. सदर बाबत अनिल साहु याचा भाऊ धुरणकुमार साहु याने दिलेल्या तक्रारी वरून खडक पो स्टे गु र नं ३६९/२०२३ भादवि कलम ३०२, ३४ आर्म अॅक्ट ३/२५, महा पो अॅक्ट ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडताच आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते. दाखल गुन्हयांची माहिती मिळताच युनिट १ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार असे घटनास्थळी भेट देवुन सीसीटीव्ही फुटेज बघत असताना आरोपीं बाबत माहिती घेत असताना पोलिस अंमलदार अनिकेत बाबर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त झाली की, दिनांक २९/१०/२०२३ रोजी रोहीत कोमकर (रा. श्रीकृष्ण हाईट्स घोरपडे पेठ, पुणे याचा वाढदिवस असल्याने त्याचे घराचे खाली वाढदिवस साजरा करण्याकरीता भरपुर मुले आली होती व ती त्याचे बिल्डींगचे पार्कीगमध्ये दारू पिवून धिंगाना करीत होती. त्यावेळी यातील अनिल साहु याची रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ लोधा व त्याचे मित्र रोहीत कोमकर व गणेश शिंदे यांचेशी कोणत्यातरी कारणावरून भांडणे झाल्याने त्या सर्वांनी मिळून संदर्भीय गुन्हा केल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर परिसरातील आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नवनाथ लोधा हा असल्याचे समजले. प्राप्त बातमी आम्ही तात्काळ वरिष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली नमुद आरोपींचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार थोरात यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, संदर्भीय गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रोहित कोमकर हा स्वारगेट पी. एम. टी. डेपो समोर उभा आहे व पोलिस अंमलदार अय्याज दड्डीकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की यातील पाहीजे आरोपीत गणेश शिंदे हा त्याचे रहाते घरी चव्हाणनगर, झांबरे हेरिटेज समोर धनकवडी, पुणे येथे आहे. दोन टिम तयार करून टिमसह आरोपी
१) रोहित संपत कोमकर (वय ३३ वर्ष रा. ७१५, गुरूवार पेठ, पुणे यास पी. एम. टी. डेपो समोरील फुटपाथ, स्वारगेट) येथून व
२) गणेश उल्हासराव शिंदे (वय ४१ वर्ष, रा. चव्हाणनगर, झांबरे हेरिटेज समोर धनकवडी, पुणे) यास झांबरे पॅराडाईज समोर सार्वजनीक रोड, चव्हाणनगर धनकवडी, पुणे येथून ताब्यात घेतले तसेच
३) अमन दिपक परदेशी (वय २९ वर्ष रा ४१, घोरपडे पेठ, पुणे) हा त्याचे रहाते घरी मिळून आला. सदर आरोपींकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे.
आरोपी रोहित कोमकर व गणेश शिंदे यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये दाखल गुन्हयातील मुख्य पाहिजे आरोपी नवनाथ लोधा याने दोन दिवसापुर्वी मयत अनिल साहु यास ५००० रुपये मागितले होते. परंतु, त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन ३०/१०/२०२३ रोजी रात्रौ ०२.०० वा सुमारास मयत व्यक्ती बिल्डींग खाली बसले असताना सदर ठिकाणी मुख्य पाहिजे आरोपी नवनाथ लोधा हा मयत व्यक्तीजवळ जावुन त्यास शिवीगाळ करुन झटापट केली. त्यावेळी मयत व्यक्तीने त्यास विरोध केल्याने त्याचा राग येवून मुख्य आरोपीने मयत व्यक्तीच्या कपाळावर बंदुकीने गोळी झाडून जिवे ठार केले मारल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे – १ सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, सपोनि आशिष कवठेकर, पोलिस अंमलदार राहुल मखरे, अजय थोरात, अनिकेत बाबर, आय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे व शशीकांत दरेकर यांनी केली आहे.
पुणे शहरात मध्यरात्री खुनाचा थरार, घरात घुसून झाडल्या गोळ्या अन्…
पुणे शहरात लहानपणापासूनच्या भांडणातून गोळीबार; एकाचा मृत्यू…
पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…
डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…
पुणे शहरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कोट्यावधींचा मुद्देमाल हस्तगत…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!