विवाहित महिलेने त्रासाला कंटाळून घेतला जगाचा निरोप…

रायगड : एका विवाहित महिलेला होत असलेली सततची मारहाण आणि हुंड्याच्या मागणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्यीच धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

प्रणाली विनायक ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात मृत प्रणाली विनायक ठाकूर यांच्या भावाने फिर्याद दिली आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली हिचे दिव येथील आरोपी पती विनायक ठाकूर याच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर प्रणाली हिला सासरच्या मंडळींनी घरगुती कारणावरून त्रास सुरू होता. माहेरहून पैसे आणण्यास सांगून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पीडितेने विष पिऊन आत्महत्या केली.

याबाबत फिर्यादी ओंकार वर्तक याने वडखळ पोलिस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीप्रमाणे (गु.र.नं.189/2023 भा.दं.वि.क. 306, 498(ए) 323, 504, 506, 34) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी पती विनायक ठाकूर यास वडखळ पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर हे करत आहेत.

युवतीने कमी उंचीमुळे घेतला जगाचा निरोप…

इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…

प्रेम आणि धमकी! FB लाइव्ह करत युवकाने मारली नदीत उडी अन्…

पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…

धक्कादायक! संशयावरून मुलींच्या डोळ्यांदेखत पतीने चाकूने चिरला पत्नीचा गळा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!