हृदयद्रावक! घराची खिडकी उचकटली अन् वडिलांनी फोडला टाहो…
कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विघ्नेश पात्रो (वय 13) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या शिक्षिकेवर गंभीर आरोप केले आहेत. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
विघ्नेश पात्रो हा आपल्या कुटुंबासह कल्याणमधील चिकणीपाडा या परिसरात वास्तव्याला होता. विघ्नेशचे वडील प्रमोदकुमार पात्रा हे रविवारी कामावर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघीही काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी विघ्नेशने घरात गळफास घेत आत्महत्या केली. विघ्नेशचे वडील कामावरून परतले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. वडिलांनी आवाज दिला मात्र काहीच आतून प्रतिसाद मिळाला नाही. घराची खिडकी उचकटून पाहिली असता लोखंडी गजाला लाल ओढणीला लटकलेला विघ्नेशचा मृतदेह दिसल्यानंतर वडिलांनी टाहो फोडला. परिसरातील नागरिक जमले घराचा दरवाजा तोडून विघ्नेशला खाली उतरून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उशीर खूप झाला होता. त्याच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली.
विघ्नेश पात्रो याने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत शाळेतील एका शिक्षिकेचा आणि मुलाचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्याने लिहीले की, ‘पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडविल्याने मी आत्महत्या करत आहे.’ पोलिस पुढील तपास करत आहेत.
यशश्री शिंदे हिचा गहाळ मोबाईल सापडला; खळबळजनक खुलासे…
हृदयद्रावक! पत्नीसोबत सेल्फी अन् घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये म्हटले…
हृदयद्रावक! अहमदनगर जिल्ह्यातील नवदाम्पत्याने संपवलं आयुष्य…
Video: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ आला समोर…
Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…