हृदयद्रावक! पतीचा मृत्यूनंतर मुलाला विष पाजून घेतला जगाचा निरोप…

अमरावती : अमरावतीमध्ये एका आईनेच आपल्या १२ वर्षाच्या मुलाला विष दिल्यानंतर स्वतःही विष घेतले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमरावती शहरातील हमालपुरा येथे घडली. योगिता गजानन वाघाडे (वय 34, रा. हमालपुरा) आणि अथर्व गजानन वाघाडे (वय 12) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. या महिलेच्या पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी महिलेला बरीच ओढातान करावी लागत होती. परिस्थिती गरीबीची होती. त्यामुळे मुलाचे संगोपनही शक्य होत नव्हते. याच परिस्थितीला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचलले. तिने आधी मुलाला विष दिलं आणि नंतर स्वतःही विष पिऊन आत्महत्या केली.

दरम्यान, दोघांचाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

हृदयद्रावक! पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आणण्याची वेळ आली बापावर…

हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!