
गुहागरच्या समुद्रात कुटुंबातील तिघे बुडाले; एकाचा मृत्यू…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले एक कुटुंब समुद्रात बुडाल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली. स्थानिक जीवरक्षकांनी तत्काळ तत्परता दाखवत दोघांचे प्राण वाचवले पण या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमोल मुथ्या (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अमोल मुथ्या हे कुटुंबासह कोकणात फिरण्यासाठी आले. कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची ट्रीप ठरली. समुद्रावर पोहण्याचा आनंद लुटताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा वाचला आहे. दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. नाताळ आणि नववर्षानिमित्त मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांनी कोकणाची वाट धरली आहे. मुंबईच्या पवई परिसरात राहणारे मिथ्या कुटुंबिय पर्यटनासाठी कोकणात दाखल झाले होते. यावेळी गुहागरच्या समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना मिथ्या कुटुंबातील तिघे जण बुडाल्याची घटना आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली होती..
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले होते. या बचावकार्याच्या माध्यमातून एका महिलेला आणि तिच्या 14 वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे. परंतु, अमोल मुथ्या यांचा या घटनेत दुदैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात पर्यटकांची विक्रमी नोंद झाली आहे. सलगच्या सुट्ट्या आणि नव वर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे.

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
हृदयद्रावक! ‘सॉरी बेटा, काळजी घे’ असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…
मुंबईत व्हॉट्सऍप चॅटींगवरून युवतीची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या…
एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…
हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांना रुम नाकारली; महिलेला कारखाली चिरडलं…

