दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…

छत्रपती संभाजीनगर: दुय्यम निबंधकाला लाच घेताना रंगेहात पकडले असून, त्यांच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. योगायोग म्हणजे बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणात या दुय्यम निबंधकाच्या निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

छगन उत्तमराव पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो सिल्लोड येथील नोंदणी कार्यालयात कार्यरत होता. सिल्लोड तालुक्यातील आमठाना येथील तक्रारदार व त्यांची भावजयी यांची धावडा शिवारातील गट क्रमांक 47/1 मध्ये सामाईक शेती आहे. या शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र दुय्यम निबंधक छगन पाटील याने 5 हजारांची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने 1 मार्च रोजी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयातच सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयाची लाच घेण्यात आली. या प्रकरणी छगन पाटील आणि स्टॅम्प वेंडर भीमराव किसन खरात या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

एसीबीच्या पथकाने तात्काळ त्याच्या घरावर छापेमारी केली. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकाला देखील धक्का बसला. कारण पाटील यांच्या घरात 1 कोटी 35 लाख रुपयांची रक्कम मिळून आली आहे. पथकाने याबाबतचा पंचनामा केला असून, छगन पाटील यांना देखील अटक करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…

रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…

Video: ‘एसीपी’साठी लाखाची लाच घेणारा अडकला ‘एसीबी’च्या जाळ्यात…

शिक्षणाच्या माहेरघरात लाच घेताना डीनला पकडले रंगेहात अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!