नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ची धडाकेबाज कामगिरी; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…

नाशिकः नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. १ने धडाकेबाज कामगिरी करताना अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ट्रकसह ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखेचे प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखेचे डॉ. सिताराम कोल्हे यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधीत असलेल्या अन्न पदार्थाची व तंबाखूची अवैधपणे विक्री करणाऱ्यांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत सक्त सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने ०४/०४/२०२४ रोजी गुन्हे शाखा, युनीट १, नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, ट्रक क्रमांक एम.एच १२ एम. व्ही- ७५१० या मध्ये दोन जण हे प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा) गाडीमध्ये भरून अवैद्य विक्री करण्याच्या उद्देशाने पेठरोड कडुन भक्तीधामकडे १५:०० ते १६:०० वाजेच्या दरम्यान येणार आहे. सदरची माहिती वपोनिरी. मधुकर कड यांना कळविली असता, त्यांनी सपोनि / हेमंत तोडकर, पोउपनि / गजानन इंगळे, पोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे, पोहवा / १८८३ विशाल काठे, पोहवा / ९०० संदिप भांड, पोहवा / १३१६ नाझीमखान पठाण, पोहवा / १०९ प्रविण वाघमारे, पोना / ३७७ प्रशांत मरकड, पोअं / २०५९ विलास
चारोस्कर, पोअं / २२६० जगेश्वर बोरसे, पोअं / २५४४ मुक्तार शेख, पोअं / २४५० राजेश राठोड तसेच चापोअं/ ८५ समाधान पवार अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे मोती सुपर मार्केट समोर, पेठरोड पंचवटी येथे सापळा लावून थांबले असताना ट्रक क्रमांक एम.एच १२ – एम. व्ही – ७५१० येताना दिसला त्यास थांबवुन सदर ट्रकमधून चालक व क्लिनर असे दोन जण खाली उतरले. १) अमोल ज्ञानोबा इंगुळकर (वय ३७, धंदा चालक, रा-मु. पो कामथडी ता. भोर जि. पुणे), २) जाबीर अफजल बागवान (वय ३६, धंदा – क्लीनर, रा- घर नं ५९ बुधवार पेठ, बाराटक्के चौक शेजारी, सातारा) असे सांगितले. सदर ट्रकची झडती घेतली असता सदर ट्रकमध्ये विक्रीकरीता आणलेला एकूण १८,५७,१२० /- रू किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू असा गुटखा अशोक लेनन ट्रकमध्ये वाहतुक करतांना मिळुन आल्याने ट्रकसह एकूण ३०,०७,१२० /- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपींविरूध्द सरकारतर्फे पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास पंचवटी पोलीस ठाणेकडील सपोनि / पडोळकर हे करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि / हेमंत तोडकर, पोउपनि / गजानन इंगळे, पोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / प्रदिप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, प्रविण वाघमारे, पोना / प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोअं/ विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, राजेश राठोड, मपोअंम / अनुजा येलवे तसेच चापोअं/ समाधान पवार यांनी केली आहे.

नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत पोलिसांच्या ताब्यात…

नाशिक पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह एकाला केली अटक…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

अपहरण! नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ची धडाकेबाज कामगिरी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!