पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी मांडलाय अक्षरशः उच्छाद…

पुणे : पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. शेअर बाजार, वर्क फ्रॉम होम आणि स्वस्त कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडून पुणेकरांनी अवघ्या काही दिवसांत तब्बल १ कोटी ३० लाख रुपये गमावले आहेत. पुणे शहरातील विविध भागांतून फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

शिवाजीनगर येथील एका ५० वर्षीय महिलेला शेअर बाजारात मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला नफा मिळाल्याचा बनाव करून चोरट्यांनी त्यांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर तब्बल ३१ लाख रुपये उकळले. बिबवेवाडीतील एका युवकालाही साडेअकरा लाखांचा गंडा घातला आहे. भवानी पेठेतील एका युवकाला कर्ज हवे होते. चोरट्यांनी सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे त्याला गाठले. कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून चोरट्यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली आणि त्याच्याकडून ४१ लाख १९ हजार रुपये उकळले. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

घरातून ऑनलाइन काम करून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून कोंढव्यात एका महिलेची १२ लाख ३४ हजारांची फसवणूक केली आहे. पाषाणमध्ये हॉटेल बुकिंगच्या नावाने एका महिलेला ६ लाख ११ हजारांना फसवले आहे. कात्रजमध्ये फेसबुक मार्केटिंगच्या नावाखाली गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून एका नागरिकाचे पावणेपाच लाख रुपये लांबवले. सायबर क्राईमच्या विविध घटना घडत आहेत.

दरम्यान, पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तीने दिलेल्या गुंतवणुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका. तसेच, तातडीने कर्ज मिळवून देणाऱ्या बनावट अ‍ॅप्स किंवा जाहिरातींपासून सावध राहा. कोणतीही आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा.

माजी IPS अधिकारी मृत्यू प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक…

नाशिकमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा…

व्यावसायिकाला Video Call केला अन् महिला लागली कपडे काढू…

Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…

Online फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; APK फाईलचा वापर…

व्हॉट्सअ‍ॅपवर RTO चालानचा मेसेज दिसला अन् लाखो रुपये गायब…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!