महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

पाटणा (बिहार): महिला पोलिसाचा एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आला होता. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शोभा कुमारी (वय २१) असे हत्या झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे.

शोभा कुमारी यांचे पती गजेंद्र यांनी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. शोभा आणि शिक्षक असलेल्या गजेंद्र या दोघांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघांना एक मुलगी आहे. विवाहानंतर शोभा हिचे एका युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. कुटुंबामध्ये प्रेमसंबंधाबाबत समजल्यानंतर शोभा तणावात होती. शिवाय, प्रेमसंबंध संपवण्यास तयार नव्हती.

गजेंद्र यांनी पोलिसांना सांगितले की, ‘शोभा हिने मला पाटणा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. यावेळी तिने बॅगेमधून पिस्तूल काढले आणि माझ्या दिशेने ताणले. यावेळी आमच्या दोघांमध्ये झटापट झाली आणि तिला गोळी लागली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. पण, मी तिला मारलेले नाही.’

आमचा दोघांचा प्रेमविवाह झाल्यानंतर पत्नीला पुढील शिक्षणासाठी पाठवले होते. यानंतर ती पोलिस दलात दाखल झाली होती. पण, पुढे तिचे एका युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिला अनेकदा समजावून सांगितले पण ती ऐकत नव्हती, असेही गजेंद्रने सांगितले. दरम्यान, गजेंद्र याने पोलिसांसमोर आत्मसमर्पन केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

व्याही आणि विहीणमध्ये जुळले प्रेमसंबंध; पळूनही गेले पण…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!