महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…

बुलढाणा : बुलढाण्यात छोटसं किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरानं सिगारेट आणि चहाची मागणी केली. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही सकाळी या, असे उत्तर महिलेने दिल्यानंतर डॉक्टरला राग अनावर झाला. याच रागातून डॉक्टरने महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

बुलढाण्यातली जळगाव जमोद तालुक्यात राहणारी एक महिला किराणा मालाचे एक छोटंसं दुकान चालवते. महिलेचे दुकान घराला लागूनच आहे. मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरने महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. महिलेनं दार उघडलं. त्यावेळी डॉक्टरने महिलेकडे एक सिगारेट आणि चहाची मागणी केली. मात्र, महिलेनं डॉक्टरला नकार दिला. आता फार उशीर झाला आहे, तुम्ही उद्या या, असे महिलेने सांगितले. पण महिलेने दिलेल्या नकारानं डॉक्टरला राग अनावर झाला. त्यानं महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचे कपडे फाडले आणि तिला निर्वस्त्र देखील केले.

गोविंद वानखेडे असे महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या महिलेला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी डॉ. गोविंद वानखेडे याच्यावर कलम 376/2024 , 74,75,76,,296,324(1),333,352,351(2),351(3),3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. पण, आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. पोलिसांकडून फरार डॉक्टरचा शोध सुरू आहे.

महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

धक्कादायक! डॉक्टर महिलेने प्रियकर नगरसेवकाचे कापले गुप्तांग…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!