Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…
पुणे : पुणे बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
नवले ब्रिजच्या अलिकडे असणाऱ्या जांभूळवाडी दरीपुलावर हा अपघात झाला. नव्या कात्रज बोगद्याच्या पुढे बंगलोरहून पुण्याच्या दिशेने कंटेनर भरधाव वेगात येत होता. तीव्र उतारावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. शिवाय, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून, वाहतूक सुरळीत केली आहे.
अपघाताचं सत्र संपेना…
पुण्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनाच वेग आणि ब्रेक फेल होऊन अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. या अपघातावर अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र तरीही अपघात थांबायचं नाव घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे बंगळूरू हायवेवर नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला होता. कात्रज चौकाकडून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने नवले पुलाजवळ चौकात सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली होती. यात महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा देखील समावेश होता. सिग्नलला उभ्या असणाऱ्या पाच वाहनांनाही जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता.
आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा जीव…
2014 पासून आतापर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 186 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
#WATCH | Maharashtra| Two were injured after a trailer carrying containers rammed into a pickup tempo on the Pune-Bangalore Highway. The injured were shifted to the hospital. Further details awaited: Pune Fire Department pic.twitter.com/IOkDJIlB1r
— ANI (@ANI) November 11, 2023
पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…
मुंबई-पुणे मार्गावरील पुलावरून मोटार पडली रेल्वेवर; तिघांचा मृत्यू…
दोन कंटेनरांच्यामध्ये कार सापडली; सहा जणांचा चिरडून मृत्यू…
पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!